शहर

सफाळे रेल्वे फाटक मृत्यूचा सापळा… एका रेल्वे कर्मचाऱ्याच्या 24 वर्षीय मुलाचा बळी.

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640

सफाळे रेल्वे फाटक मृत्यूचा सापळा या सापळ्यात आणखीन एका 24 वर्षीय तरुणाचा रेल्वे अपघात होऊन जागीच मृत्यू झाला आहे. हा तरुण सफाळे सरावली या गावचा रहिवासी होता. त्याचे वडील पश्चिम रेल्वेच्या मुंबई परेल येथील कार सेट इलेक्ट्रॉनिक डिपार्टमेंट मध्ये काम करतात

शनिवार दिनांक 12 एप्रिल 2025 रोजी दीपेश गंगाधर पाटील हा (24) वर्षीय तरुण रात्री पावणे नऊ वाजता सफाळे येथे गेला होता. त्याला सफाळे रेल्वे फाटक क्रॉस करून जाण्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्यामुळे सफाळे फाटक खांबा किलोमीटर क्रमांक 75 /22 येथून तो रेल्वे क्रॉस करत असताना 12971 ही भावनगरी फास्ट एक्सप्रेस गुजरात कडे जात असताना त्याचा रेल्वे रूळ क्रॉस करताना अपघात होऊन मृत्यू झाला आहे. अशी माहिती भावनगरी एक्सप्रेस लोको पायलट यांनी सफाळे रेल्वे स्टेशन मास्तर यांना दिली असून याबाबत रेल्वे पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button