पिंपरी बुद्रुक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बालदिंडी उत्साहात साजरी

बावडा प्रतिनिधी मोहंमद कैफ तांबोळी मोबाईल 8378076123
पिंपरी बुद्रुक येथील जिल्हा परीषद शाळेतील चिमुकल्यांनी ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषात गावातून बालदिंडी काढली. विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर ,संत तुकाराम तसेच इतर सर्व विद्यार्थी व शिक्षक वारकरी पोशाखात दिंडीत सहभागी झाले होते. पिंपरी बुद्रुक गावातील भजनी मंडळीसोबत टाळ मृदंगाच्या जयघोषात विद्यार्थ्यांनी ज्ञानोबा तुकाराम म्हणत ठेका धरला. दिंडीमध्ये पालक, ग्रामस्थ तसेच पदाधिकारी मोठ्या संख्येने सामील झाले होते. दिंडीचे यशस्वी आयोजन करण्यासाठी मुख्याध्यापक दत्तात्रय शेंडे, उपशिक्षक राहुल निर्मळ व रत्नप्रदिप मुधळे यांनी परिश्रम घेतले.

शाळा स्थापनेपासून गावातून प्रथमच शाळेची दिंडी निघाल्यामुळे सरपंच ज्योती श्रीकांत बोडके, उपसरपंच पांडूदादा बोडके, सर्व आजी माजी सदस्य, ग्रामस्थ, पालकांनी शाळेतील शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.




