संतशिरोमणी नरहरी सोनार महाराज पायी दिंडी पालखी सोहळ्याचे पिंपरी बुद्रुक येथे स्वागत व अन्नदान

बावडा प्रतिनिधी मोहंमद कैफ तांबोळी मोबाईल 8378076123
संतशिरोमणी नरहरी सोनार महाराज पायी दिंडी पालखी सोहळा नरसिंहपूर येथील मुक्काम आटोपून दुपारच्या विसाव्यासाठी पिंपरी बुद्रुक (ता. इंदापूर) येथे दाखल झाला. या वेळी वारकऱ्यांचे ग्रामस्थांनी उत्साहात स्वागत करून अन्नदान केले. त्यानंतर पालखी अकलूज मुक्कामासाठी मार्गस्थ झाली.

नेवासे (जि. नगर) येथील संत शिरोमणी नरहरी सोनार महाराजांची पायी दिंडी नीरा नरसिंहपूर येथे काल सायंकाळी दाखल झाली होती. यावेळी सरपंच अश्विनी चंद्रकांत सरवदे, उपसरपंच रेणूका काकडे, विठ्ठल देशमुख, आनंद काकडे, मगनदास क्षीरसागर, राजेंद्र बळवंतराव, दत्तात्रेय कोळी महाराज, शंकर राऊत, ग्रामसेवक गणेश लंबाते यांच्यासह ग्रामस्थांनी पालखीचे स्वागत केले. हनुमंत कोळी यांच्या वतीने परंपरेप्रमाणे अन्नदान करण्यात आले.

आज सकाळी पालखी सोहळा बावडा नरसिंहपूर रस्त्याने येताना आडोबा व टणू ग्रामस्थातर्फे संदीप मोहिते, सचिन मोहिते, रणधीर मोहिते, बाळासाहेब जाधव, कोळी पाव्हणं आदी ग्रामस्थांनी स्वागत केले. पिंपरी येथे दुपारच्या विसाव्याप्रसंगी वारकऱ्यांना लोकनेते कै. महादेवराव बोडके दादा यांच्या स्मरणार्थ दुपारचे अन्नदान करण्यात आले. यावेळी विद्यालयाच्या अध्यक्षा सुभद्रा बोडके, समाधान बोडके, संतोष सुतार यांच्यासह ग्रामस्थांनी जेवणाची व्यवस्था केली.

बबन बोडके, महेश बोडके, प्रविण बोडके, मल्हारी कोळी, तेजस बोडके, पोपट बोडके, केशव बोडके, शशिकांत सुर्यवंशी, बाळू आत्तार आदींनी वाढपीचे संयोजन केले.संत शिरोमणी नरहरी सोनार महाराजांची पायी दिंडीचे प्रस्थान गोंदी, लुमेवाडी मार्गे अकलूजच्या दिशेने झाले. अकलूज येथे बाळासाहेब दहिवाळ यांच्याकडे पायी दिंडी मुक्कामासाठी मार्गस्थ झाली.



