महाराष्ट्र

किरण धाईंजे यांची आरपीआय(आठवले) युवक आघाडीच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी निवड

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदासजी आठवले व प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्यावरील निष्ठा व पक्षवाढीसाठी केलेले प्रामाणिक काम पाहून युवक नेते किरण धाईंजे यांची मुंबईतील मराठी पत्रकार मंडळ येथे युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे व युवक आघाडीचे महाराष्ट्र सरचिटणीस डॉ. विजय मोरे यांच्या हस्ते आरपीआय (आठवले) युवक आघाडीच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

किरण धाईंजे हे गेल्या अनेक वर्षांपासून विविध जाती, धर्मातील लोकांना सोबत घेऊन आंबेडकरी चळवळीत काम करीत आहेत. त्यांनी कधीही न मिटणारे वाद दोन्ही पार्ट्यांना आपल्या ऑफिसमध्ये बसवून मिटवले आहेत. त्यामुळे एखादा विषय मिटवायचा असेल तर लोक किरण धाईंजे यांचे ऑफिस गाठतात. किरण धाईंजे हे आंबेडकरी चळवळीत झोकून देऊन काम करीत असल्याने त्यांना महाराष्ट्रावर काम करण्याची संधी मिळाल्याने ते या संधीचे सोने करून महाराष्ट्रभर आरपीआय (आठवले) ची मजबूत फळी निर्माण करतील असा आशावाद माळशिरस तालुक्यातून व्यक्त होत आहे.

ना.रामदासजी आठवले व प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्या आदेशान्वये सदरची निवड झाल्याने त्यांच्या निवडीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. यादरम्यान त्यांच्यावर विविध जाती, धर्मातील लोकांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. यावेळी किरण धाईंजे यांनी भविष्यात आरपीआय (आठवले) ला महाराष्ट्रातील गावागावात पोहोचविण्यासाठी प्रामाणिक काम करून सर्व जाती, धर्मातील युवकांना पक्षात सामावून घेणार असल्याचे सांगितले. तसेच पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही असे म्हणून गावागावात कार्यकर्त्यांची मजबूत फळी निर्माण करणार असे यावेळी ते म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button