माळीनगर/सवतगव्हाण येथील मुस्लिम दफनभूमी मध्ये निवारा शेड व सुशोभीकरण कामाचा शुभारंभ

माळीनगर ——-प्रतिनिधी रियाज मुलाणी.
मो. 99 21 500 780
सवतगव्हाण येथे मुस्लिम समाज बांधव दफनभूमीमध्ये माळशिरस तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन नितीनराजे निंबाळकर यांच्या , प्रयत्नाने जिल्हा नियोजन समिती जनसुविधा योजने अंतर्गत निवारा शेड व सुशोभीकरण कामाचा शुभारंभ सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे नूतन संचालक विराजसिंह निंबाळकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुस्लिम समाजाचे अध्यक्ष शमशुद्दीन शेख, ज्येष्ठ नागरिक अब्बासभाई तांबोळी,उपाध्यक्ष जब्बारभाई तांबोळी,सलिमभाई शेख, लायकभाई सय्यद, बादशाह शेख , रणजितसिंह निंबाळकर,अविनाश जाधव, यशराज निंबाळकर, वसीम शेख, शरीफ काझी, मुन्ना काझी, हमीद शेख,सादिक शेख, मुबारक तांबोळी, अमिर शेख, उपसरपंच नाना बंडगर , दादासाहेब लवटे, एजाज शेख,करण इनामके,मोहम्मद शेख, चांद शेख, नदाफ, गफूर शेख, शोकत जमादार, इमरान तांबोळी व ग्रामस्थ उपस्थित होते
याप्रसंगी मुस्लिम समाजबांधव यांच्या वतीने सलिमभाई शेख यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन करून प्रमुख मान्यवरांचा सत्कार करण्यात आला ग्रामसेवक विवेक साखरे,लिपिक सत्तार शेख, यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते. उपस्थित मान्यवरांचे आभार सलिमभाई शेख, यांनी मानले अल्पोआहार चहा पाण्याने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वसीमभाई शेख, आमिरभाई शेख, राजूभाई शेख, आरिफभाई शेख यांनी परिश्रम घेतले.



