महाराष्ट्र

सराटीत साडेआठ हजाराची केबल चोरी करणाऱ्या इसमास पोलीसांनी पकडले

बावडा प्रतिनिधी मोहंमद कैफ तांबोळी, मोबाईल -8378076123

बावडा चौकी हद्दीत रात्रगस्त दरम्यान मौजे सराटी गावचे हद्दीमध्ये एक इसम केबल चोरी करून गाडीवर घेऊन अकलूज कडे जाताना पकडले. त्याच्याकडून ८५०० रूपयांची ४०० फुट केबल मिळून आली. सदर इसमाला ताब्यात घेवून गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

इंदापूर पोलीस स्टेशन अंकित बावडा दूरक्षेत्र हद्दीमध्ये विहिरीवरील मोटर चोरी केबल चोरीचे प्रमाण वाढल्याने बावडा चौकी हद्दीत रात्रगस्त सुरू करण्यात आली आहे. सहाय्यक फौजदार के.बी.शिंदे, पोलीस नाईक अमोल गायकवाड, आप्पा हेगडे मौजे सराटी गावचे हद्दीमध्ये रात्रगस्त करत होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील यांना गोपनीय बातमीदाराकडून सदरची माहिती मिळाली. त्यानुसार केबलची चोरी करून अकलूज कडे निघालेल्या आरोपींची माहिती मिळताच सराटी गावातील पोलीस मित्रांची मदत घेऊन सदर आरोपीचा पाठलाग करून पकडले. त्याच्याकडून ८५०० रूपयांची ४०० फुट केबल हस्तगत करण्यात आली. पोलीस स्टेशनला आणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार के. बी. शिंदे करत आहेत.

सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक बारामती आनंद भोईटे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती विभाग गणेश इंगळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, सहाय्यक फौजदार के.बी शिंदे, पोलीस नाईक गायकवाड, हेगडे, पोलीस मित्र हनुमंत भोसले, तानाजी शेंडगे, सिद्धू कांबळे यांनी मिळून केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button