शैक्षणिक
संग्राम नगर येथील , जयसिंह मोहिते पाटील प्राथमिक शाळेत खाऊ वाटप करून व गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत

उपसंपादक ——-हुसेन मुलाणी टाइम्स 9. मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448
संग्राम नगर येथील जयसिंह मोहिते पाटील प्रशालेमध्ये सन 2023 /24 या नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभारंभ निमित्ताने , जयसिंह मोहिते पाटील प्रशालेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत प्रशाला समितीचे सदस्य महादेवराव अंधारे यांनी गुलाब पुष्प व खाऊ देऊन केले

तसेच सर्व विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या याप्रसंगी जयसिंह मोहिते पाटील संग्राम नगर प्रशालेचे मुख्याध्यापक– फिरोज तांबोळी बालवाडी विभाग प्रमुख सूर्यवंशी मॅडमने, खंडागळे सर, पवार मॅडम , कदम मॅडम, तसेच बहुसंख्येने विद्यार्थी व पालक उपस्थित होते




