महाराष्ट्र

शंकर नगर येथील सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये राजमाता जिजाऊ यांची पुण्यतिथी साजरी

उपसंपादक—— हुसेन मुलाणी टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448

महर्षि शंकरराव मोहिते – पाटील इन्स्टिटयुट ऑफ टेक्नॉलॉजी अॅण्ड रिसर्च , शंकरनगर अकलूज या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये दि . १७/०६/२०२३ रोजी राजमाता जिजाऊ यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . प्रविण ढवळे यांनी दिली . राजमाता जिजाऊ यांच्या पुण्यतिथीसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य , कार्यालयीन अधिक्षक , सर्व विभागाचे विभागप्रमुख शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते .

राजमाता जिजाऊ यांच्या पुण्यतिथी निमीत्त कॉम्प्युटर पदविका विभागातील प्रा . श्रेया देशमुख या वक्त्या म्हणून लाभल्या. त्यांनी त्यांच्या मनोगतामध्ये राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसारखा थोर महापुरूष कसा घडविला याबद्दल आपले विचार,व्यक्त केले .

महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी राजमाता जिजाऊ यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून महाविद्यालयातील मुली व महिला कर्मचा – यांकरीता स्वसंरक्षण कसे करावयाचे त्याचे प्रशिक्षण चालू करण्याचे आवाहन करून महाविद्यालयातील मुलांना शिक्षणाबरोबर थोर महापुरुषांच्या चरित्राची माहिती मिळावी या उद्देशाने ग्रंथालयामध्ये वेगळा विभाग सुरू करून, त्यामध्ये थोर महापुरूषांचे चरित्र उपलब्ध करून देण्याचेदेखील आवाहन केले .

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा . श्रीकांत कासे यांनी केले .

डॉ. प्रविण ढवळे
प्राचार्य
सहकार महर्षि शंकररराव मोहिते – पाटील इन्स्टिटयुट ऑफ टेक्नॉलॉजी अॅण्ड रिसर्च , शंकरनगर – अकलूज .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button