महाराष्ट्र

श्रीपूर परिसरातील पाणी पातळी खाली गेली

बी.टी.शिवशरण

श्रीपूर: या वर्षीचा कडक उन्हाळा व सध्या लांबलेला मान्सून त्यात या परिसरातील पाणी पातळी खाली गेल्याने पाणी संकट ओढवण्याची परिस्थिती उदभवली आहे काही भागात पाण्याचे स्रोत आटू लागले आहेत या भागातील विहरी बोअर यांच्यातील पाणी पातळी खाली गेली आहे त्यामुळे पाणीपुरवठा कमी दाबाने होत आहे गेल्या वर्षी मान्सून वेळेवर धडकला होता सात जूनला बहुतांश भागात दमदार पाऊस झाला होता मात्र यावर्षी मान्सून सुमारे पंधरा दिवस उशिरा येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे

त्यामुळे शेतकरी वर्ग सर्वसामान्य नागरिक उद्योगं क्षेत्रात धास्ती निर्माण झाली आहे आषाढी वारी प्रस्थान होऊन आठवडा होत आहे पाऊस नसल्याने तसेच ऊन कमी झालेले नाही उन्हाचा चटका सहन करत पालखी सोहळ्यातील वारकरी पंढरपूरकडे मार्गक्रमण करत आहेत पालखी महामार्गवरील रस्त्याच्या कामामुळे अनेक मोठे वृक्ष तोडण्यात आले आहेत त्यामुळे वारकऱ्यांना विसाव्या साठी सावली नसल्याने त्रास सहन करावा लागत असल्याने अनेक वारकरी माघारी येत असल्याची परिस्थिती आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button