महाराष्ट्र

अकलूज येथील नामवंत डॉ. राजीव राणे यांच्या “संघर्ष “या आत्मचरित्र चे मंत्री नारायण राणे यांनी केले कौतुक

उपसंपादक——- हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो ;- 97 30 867 448

अकलूज येथिल सुप्रसिध्द बालरोग तज्ञ डाॕ.राजीव राणे यांच्या जिवनावर आधारीत “संघर्ष”हे आत्मचरीत्र समाजासाठी दिशादर्शक ठरणारे आहे.त्यांचा संघर्ष समाजासाठी नक्कीच दिशादर्शक ठरणारे आहे अशा शब्दात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी डाॕ.राणे यांच्या ” संघर्ष”या आत्मचरीत्राचे कौतुक करुन त्यांच्या संघर्षावर कौतुकाची थाप टाकली.

अकलूज डाॕ.राजीव राणे यांच्या जिवनावर आधारीत संघर्ष आणि त्यातुन मिळविलेले यश यावर आधारीत आत्मचरीत्राचे प्रकाशन नुकतेच आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांचे शुभहस्ते करण्यात आले होते.
त्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे हे सोलापुर जिल्ह्यातील मोहोळ येथे आले असता डाॕ.राणे यांनी “संघर्ष”आत्मचरीत्र नारायण राणे यांना भेट देत त्यातील पुस्तकातील सारांश सांगत जिवनातील चढउतार सांगितले. मंत्री नारायत राणे यांचे आत्मचरीत्रातील वास्तव समजावुन घेत डाॕ.राणे यांच्या जीवन प्रवासाचे कौतुक करुन त्यांचे अथक परीश्रम आणि त्यातुन मिळविलेले यशाचे कौतुक केले. भाजपाचे नेते प्रविण दरेकर, डॉ.निलकंठ कोरके, डॉ.आनंद देशमुख , डाॕ.शिंदे आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button