मुलींनी बॉयफ्रेंड व प्रिय कराच्या बाबत सावधानता बाळगावी

कोवळ्या कळीवर वासनांध राक्षसी अत्याचार सत्य घटनेवर आधारित सांगलीतील खळबळ जनक प्रकार
टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क
नाविण्य ,म्हणून प्रियकर यासोबत पहिल्यांदा कॅफे मध्ये , लॉज मध्ये जाऊन ,भेट घेण्याची फार मोठी किंमत. मुलींना “चुकवावी” लागत आहे .काही दिवसापूर्वी अशी *खळबळजनक घटना घडली आहे. पालकांना सावध करण्यासाठीच या लेखाचे प्रयोजन आहे .
तरुणाच्या स्टाईलला , नवनवीन दुचाकीला, प्रेमाला “भुलून” ,मुली तरुणांशी मैत्री करतात. पहिल्या भेटीत कॅफे व लॉज मध्ये नेले जाते .त्यानंतर कोल्ड्रिंक्स. मधून गुंगीचे औषध. देऊन ,मुलीला नग्न करून , शरीरसंबंधाचे फोटो काढून त्या तरुणीला वर्ष ,दोन वर्ष ब्लॅकमेलिंग. करून , हजारो रुपये लुटून , सोशल मीडियावर फोटो “प्रदर्शित” करण्याची “धमकी” देऊन अत्याचार केले जातात .
मुली अशा त्रासाला कंटाळुन आपल्या आई – वडिलांना सांगतात ..किंवा सर्वात शेवटी आत्महत्या. करण्याचा प्रयत्न करतात .पालकांनी देखील आपली मुलगी कोठे जाते , शाळेची वेळ किती आहे ,याची माहिती घ्यावी.मुलीच्या शाळेतील व्हाटसपग्रुप वर शाळेची व क्लासची वेळ सांगितलेली असते .पालकांनी दररोज ती तपासून पाहावी .

पालकांनी सर्वप्रथम आपल्या मुलीला विश्वासात घेऊन मुले कसे फसवतात , मोबाईल मध्ये आपल्या नकळत फोटो काढतात , गुंगीचे औषध देऊन ,”शरीरसंबंध” करतात , व ब्लॅकमेलिंग करतात,हे पालकांनी आपल्या मुलीला खुलेपणाने. सांगितले पाहिजे .
मुलींना ,तरुणांनी भेटायला बाहेर बोलावले तर नकार द्यायला “शिकवा” , पहिला नकार , आयुष्यात येणाऱ्या अंधाऱ्या गर्तेतुन बाहेर काढणारा ठरत असतो .
मुलींनो ,तुम्ही ज्या तरुणासोबत गेला आहात ,तो तुमचे मोबाईल मधून चित्रीकरण करत आहे ,हे समजून घ्या.पालकांनो ,मुलींना “सावध” करा ..त्यांना शहाणे करा,नाहीतर याचे गंभीर परिणाम भोगण्यास तयार व्हा !
आ .इकबाल मुल्ला ( पत्रकार) संपादक – सांगली वेध ,
संपादक – वेध मीडिया न्यूज , सांगली
मोबाईल – 898358710



