इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन ने पास केलेले कन्वेंशन ची अंमलबजावणी करावी- ज्योतीताई कुंभार

उपसंपादक——–हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो;- 97 30 867 448
इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन यांनी पास केलेले कन्वेक्शनची अंमलबजावणी करून घरकाम करणाऱ्या कामगारांना घरेलू कामगार म्हणून संबोधण्यात यावे अशी मागणी, सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी संघटित कामगार, कर्मचारी कामगार विभाग च्या, जिल्हा अध्यक्ष ज्योतीताई कुंभार यांनी, जिल्हा अधिकारी सोलापूर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे
विशेषतः घरकाम करणाऱ्या महिलांना घरेलू कामगार म्हणून संबोधण्यात येते. अशा सर्व घरेलू कामगारांची संख्या राज्यात व देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आहे व त्यांच्या श्रमाचे मूल्यमापन होत नाही, हे खेदाने या ठिकाणी व्यक्त करावे लागत आहे.

16 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय घरेलू कामगार दिवस म्हणून जगभर साजरा केला जातो व या दिवशी घरेलू कामगारांच्या श्रमाला सन्मान दिला जातो. घरेलू कामगारांच्या श्रमाचे मोल ओळखून, घरेलू कामगारांसाठी इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन (ILO) यांनी C-189 हे कन्वेंशन पास केले आहे. हे कन्वेंशन भारतामध्ये अंमलबजावणी करणे क्रमप्राप्त आहे. त्याची अंमलबजावणी ताबडतोब करण्यात यावी.
त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार कल्याण मंडळाची स्थापना झाली. परंतु या मंडळामार्फत कोणत्याही योजना सध्या कार्यान्वित नाहीत, ही बाब अत्यंत खेदाची आहे. या घरेलू कामगार कल्याण मंडळाचे पुनर्गठन तात्काळ करण्यात यावे व त्याद्वारे विविध योजना घरेलू कामगारांना देण्यात याव्यात. इत्यादी मागण्या निवेदनाद्वारे काँग्रेसने महाराष्ट्र सरकारकडे केली आहे



