महाराष्ट्र
अकलूज च्या शिरपेचात मानाचा तुरा…तन्वी राणेचे घवघवीत यश..

उपसंपादक——- हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क
मो . 97 30 86 74 48
अकलूज येथील ॲपेक्स हाॕस्पिटल चे संचालक सुप्रसिध्द ह्दय रोग तज्ञ डाॕ.नितिन राजीव राणे यांची कन्या कु. तन्वी राणे हिने इंडियन सेंटर फाॕर सेकंडरी एज्युकेशन बोर्डाच्या इ.10 च्या परीक्षेत 98.20 टक्के गुण मिळवुन अकलूज च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला.
देशपातळीवर नाव लौकीक असलेल्या पुणे मुळशी येथिल रीव्हरडे इंटरनॅशनल स्कुलमध्ये तन्वी राणे इ.10वी मध्ये शिक्षण घेत होती.
तिच्या यशामुळे अकलूज चे नाव देशपातळीवर गाजले असुन तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.



