महाराष्ट्र

सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये थेट व्दितीय वर्ष पदविका अभियांत्रिकीचे सुविधा केंद्र उपलब्ध

उपसंपादक—— हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो . 97 30 867 448

अकलूज. येथील सहकार महर्षि शंकरराव मोहिते – पाटील इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी अॅण्ड रिसर्च , शंकरनगर- अकलूज या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये दि . १२/०६/२०२३ पासून थेट व्दितीय वर्ष पदविका अभियांत्रिकीचे सुविधा केंद्र सुरु झालेले असून विद्यार्थ्यांना दि . ०३/०७/२०२३ अखेर अर्ज करता येणार आहे . सुविधा केंद्राचा नंबर एफ . सी . ६७८२ असा असून सुविधा केंद्रामध्ये विद्यार्थ्यांना नाव नोंदणी अर्ज नोंदणी व निश्चिती करता येणार आहे .

अकलूजमधील विद्यार्थ्याना महाविद्यालयामध्ये येण्याकरीता सकाळी १०.०० व दुपारी ०२.०० वाजता बसची सोय करण्यात आलेली आहे . बसचा मार्ग विजय चौक – गांधी चौक – जुने एसटी स्टॅन्ड – सदुभाऊ चौक – माळेवाडी महाविद्यालय – नवीन एसटी स्टॅन्ड ते महाविद्यालय असा आहे . बससेवेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी श्री . रामदास सुर्वे मो . नं . ९ ७३०४८०४१० यांच्याशी संपर्क साधावा . थेट व्दितीय वर्ष पदविका अभियांत्रिकीमध्ये बारावी विज्ञान , एमसीव्हीसी ( Vocational ) तसेच २ वर्षाचा आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात आहे . अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . प्रविण ढवळे यांनी दिली .

महाविद्यालयामध्ये पदविका अभियांत्रिकीच्या सिव्हील इंजिनिअरींग ( Choice Code : 678219110 ) , मेकॅनिकल इंजिनिअरींग ( Choice Code : 678261210 ), इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग ( Choice Code : 678229310 ) व कॉम्प्युटर इंजिनिअरींग ( Choice Code : 678224510 ) या शाखा उपलब्ध आहेत . महाविद्यालयामध्ये पदविका अभियांत्रिकी सुविधा केंद्राबरोबरच विद्यार्थ्यांना १० वी व १२ वी नंतर असणा – या शिक्षणाच्या संधी याबाबत मार्गदर्शन कक्ष उपलब्ध करून देण्यात आलेला आहे ,

जेणेकरून विद्यार्थी व पालकांना पुढील शिक्षणासाठी मार्गदर्शन मिळावे . तरी अकलूज व परीसरातील विद्यार्थी व पालकांनी महाविद्यालयास भेट देवून किंवा थेट व्दितीय वर्ष सुविधा केंद्र प्रमुख प्रा . गौरव फडे ( Mob . No. 9730311067 ) यांच्याशी संपर्क साधून या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . प्रविण ढवळे यांनी केले .

डॉ . प्रविण ढवळे
प्राचार्य
सहकार महर्षी शंकरराव माहिते – पाटील इन्स्टिटयुट ऑफ टेक्नॉलॉजी अॅण्ड रिसर्च , शंकरनगर – अकलूज .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button