महाराष्ट्र
आषाढी सोहळ्या दरम्यानपरिसरातील अवैध धंदे बंद ठेवण्याची मागणी

बी.टी.शिवशरण
देहू व आळंदी येथून पालखी सोहळा प्रस्थान झाले आहे आषाढी वारी दरम्यान अकलूज माळीनगर वेळापूर माळशिरस शंकरनगर श्रीपूर बोरगाव परिसरातील सर्व अवैध धंदे बंद ठेवण्याची मागणी नागरिकांतून होत आहे पालखी सोहळ्यात वारकरी संप्रदाय तर असतोच पण विठू माझा लेकूरवाळा संगे भक्तांचा मेळा या प्रमाणे सोहळ्यात हौसे नवसे गवसे लफनंगे यांचाही वावर सहभाग असतो त्या दरम्यान अवैध धंद्या मुळे काही अनुचित तसेच गैर प्रकार होत असतात त्यामुळे सोहळ्याला गालबोट लागू नये ही अपेक्षा आहे या सर्व बाबींचा विचार करुन या परिसरातील हातभट्टी दारू मटका जुगार क्लब ऑनलाईन लॉटरी वेश्या व्यवसाय बंद करण्याची मागणी आहे



