“अखिल भारतीय शिव स्वराज्य सेने “च्या महाराष्ट्र प्रदेश “अध्यक्षपदी “बारामतीच्या कल्पना जाधव (काटकर) यांची निवड !

उपसंपादक ——–हुसेन मुलाणी टाइम्स 9, मराठी न्यूज नेटवर्क मो. . 97 30 867 448
बारामती येथील सामाजिक कार्यकर्त्या व बारामती तालुका शिवसेना महिला आघाडीच्या संघटक ,कल्पनाताई जाधव (काटकर) यांची “अखिल भारतीय शिवस्वराज्य सेने “च्या महाराष्ट्र प्रदेश महिला-अध्यक्ष पदी निवड केल्याचे पत्र संस्थापक/ अध्यक्ष कैलास पाटील मुंबई यांनी निवड केल्याचे नियुक्तीपत्र देण्यात आहे.
कल्पनाताई जाधव सदैव स्वतःच्या डोक्यावरचा दुःखाचा डोंगर बाजूला सारून नेहमी इतरांच्या सुखदुःखात अहोरात्र सक्रिय असणाऱ्या एक आदर्श कुशल संघटक असून नेहमी सामाजिक कार्यात असलेल्या आपला आदर समाजाची प्रगती उंच शिखरावर नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि विविध राजकीय व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून बहुसंख्य पुरस्काराने सन्मानित करून गौरविण्यात आलेल्या नेहमी सकारात्मक सामाजिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून राजकारणाच्या पलीकडे अर्थातच राजकारणात स्वतःच्या फायद्यासाठी नाही तर जनतेसाठी करत असलेल्या कार्याचे समाजामध्ये आपली एक आदर्श आणि आगळीवेगळी ओळख निर्माण करणाऱ्या कल्पनाताई जाधव( काटकर )यांची अखिल भारतीय स्वराज्य सेनेच्या महाराष्ट्रराज्य महिला प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करून त्यांच्या कार्याची पोच पावतीच त्यांना मिळाली

शिवाय यापूर्वी कल्पनाताई ना अनेक पुरस्कार मिळाले असून, ते आजही , सचिव– महाराष्ट्र प्रदेश शिक्षकेतर कर्मचारी सेना, -अध्यक्ष बारामती तालुका अँटी करप्शन, क्राइम कंट्रोल, कमिटी, –अध्यक्ष आंतरराष्ट्रीय मानवाधिकार, न्यायिक सुरक्षा परिषद पश्चिम महाराष्ट्र,,– सचिव महाराष्ट्र राज्य राजमाता बहुउद्देशीय सामाजिक, सेवाभावी संस्था- इत्यादी पदावर कार्य करून समाजाप्रतिनिष्टेने कार्य करत आहेत त्याची दखल घेऊन अखिल भारतीय शिवराज्य सेनेच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे त्यांच्या या निवडी मुळे त्यांच्यावर अभिनंदन असा वर्षाव होत आहे

कल्पनाताई जाधव (काटकर) यांची अखिल भारतीय शिवस्वराज्य सेनेच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल टाइम्स नाईन मराठी न्यूज नेटवर्क परिवार व संपादक– नौशाद मुलाणी उपसंपादक —हुसेन मुलाणी यांच्यावतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन



