महाराष्ट्र

दैव बलवत्तर भरघाव वेगाने येणाऱ्या टिप्पर पासून प्रसंगावधान राखत खासदार ओमराजे निंबाळकर थोडक्यात बचावले

उपसंपादक—— हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो .97 30 867 448

धाराशिव चे कर्तव्यदक्ष व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार, ओमराजे निंबाळकर हे सकाळी आपल्या निवासस्थानापासून गोवर्धन वाडी ते तेर दरम्यान व्यायामासाठी जात असताना टिप्पर चालक रामेश्वर कांबळे राहणार अंबाजोगाई जिल्हा बीड याने त्यांचा टिपर क्रमांक एम-एच-४४ के ८८४४ हा भरगाव वेगाने चालवत खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या अंगावर घातले मात्र ओमराजे यांनी प्रसंगावधान राखत रोडच्या खालच्या बाजूला उडी मारल्यामुळे त्यांचा जीव बाल बाल बचावला

मात्र टिप्परच्या पाठीमागून येत असलेले उमेश थोडसरे यांनी मोटरसायकलवर त्या टिप्पर चा पाठलाग करत जवळच असलेल्या रेल्वे फाटक पडल्याने फाटकावर टिप्पर थांबला व एकास पकडले , असून ढोकी पोलीस स्टेशनला याबाबत कलम 279 336 व 184 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे

याबाबत हा घातपात आहे की अपघात याचा तपास पोलीस करत असून चालकाचे म्हणणे आहे की मोटर सायकल ला ओव्हरटेक करताना हा प्रकार घडल्याचे त्याने सांगितले या संदर्भात खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सांगितले की मी सुखरूप असून सुदैवाने बचावलो आणि काही काळजी करू नये अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button