शंकरराव मोहिते महाविद्यालयात शिवराज्याभिषेक दिन व जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात साजरा.

उपसंपादक——-हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448
अकलूज येथील महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने शिवराज्याभिषेक दिन व जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून प्रा.बाळासाहेब साळुंखे होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दत्तात्रय बागडे होते.
प्रमुख वक्ते बाळासाहेब साळुंखे यांनी मार्गदर्शन करताना जागतिक पर्यावरण दिनाचे महत्त्व पटवून दिले.जागतिक स्तरावर पर्यावरणाचे संरक्षण करणे हे भावी पिढ्यांसाठी अत्यंत आवश्यक आहे असे सांगितले.
शिवराज्यभिषेक दिनानिमित्त महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचा विद्यार्थी शुभम हेडगे यांनी आपल्या मनोगतातून शिवस्वराज्य दिनानिमित्त शिवराज्याभिषेक सोहळ्याचे महत्त्व विषद केले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दत्तात्रय बागडे यांनी अध्यक्षीय मनोगतामध्ये पर्यावरणाचे संतुलन राखणे ही जगाची व मानव जातीची गरज बनलेली आहे. तसेच शिवाजी महाराजांचे पर्यावरण विषयक विचारांची जाणीव जागृती विद्यार्थ्यांमध्ये होणे गरजेचे आहे,असे मत व्यक्त केले.यावेळी डॉ.जनार्दन परकाळे यांनी शिवाजी महाराजांच्या स्वराज्य संकल्पना विषयी मनोगत व्यक्त केले.पुढे त्यांनी आपल्या मनोगतामध्ये शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्या पर्यंतचा स्वराज्य निर्मितीचा इतिहास मांडला.तसेच याप्रसंगी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महाविद्यालय परिसरामध्ये वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.डि.जी.मगर यांनी केले,तर आभार राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.सज्जन पवार यांनी मानले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वयंसेवक हितेश पुंज यांने केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागातील स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.



