महाराष्ट्र

वाढत्या दलित अत्याचाराविरोधात अकलूज मध्ये बौद्ध समाजाचा निषेध

उपसंपादक——- हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448

राज्यामध्ये सध्याच्या प्रमाणामध्ये वाढ झाली आहे याचा निषेध म्हणून अकलूज येथे समस्त बौद्ध समाजाच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला यावेळी भालेराव प्रकरणातील आरोपीवर तात्काळ कारवाई करावी तसेच बौद्ध समाजाच्या विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचारा विरोधातील आरोपीवर कडक कारवाई करावी अशी मागणी अकलूज येथील समस्त बौद्ध समाजाच्या वतीने प्रांताधिकारी यांच्याकडे केली आहे.

नांदेड येथील अक्षय भालेराव प्रकरणातील आरोपींना कडक शासन द्यावे तसेच मुंबईमध्ये संगणकीय शिक्षण घेत असलेल्या बौद्ध समाजाच्या विद्यार्थीनीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी आरोपीवर कडक शासन करावे अशी मागणी अकलूज शहरांमधील सर्व बौद्ध समाज यांचे वतीने करण्यात आली आहे यावेळी प्रांताधिकारी यांना निषेधाचे व कारवाई करण्याचे पत्र देण्यात आले याप्रसंगी बौद्ध समाजातील सर्व मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button