महाराष्ट्र

अकलूज नगरपरिषदच्या मालमत्तेची तोडफोड करून बेकायदेशीर अतिक्रमण करणाऱ्याला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करावी

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क

अकलूज येथील सदुभाऊ चौक बँक ऑफ बडोदा शेजारील नगरपरिषदेच्या मालकीच्या असलेल्या मालमतेची महावीर शहा यांनी गटारीची मनमानी पद्धतीने कोणतेही पूर्व सूचना व पूर्व परवानगी न घेता स्वतःच्या स्वार्थापोटी नगरपरिषदेच्या मालमतेचे नुकसान केले आहे तरीसुद्धा नगरपरिषदेने महावीर शहा यांच्या विषयी लेखी तक्रार येऊन सुद्धा कोणतीच कारवाई केली नाही चांगली गटर फोडून त्यामध्ये सिमेंट पाईप टाकून त्यावर पत्रा कंपाऊंड करून अतिक्रमण केले असल्याचे वारंवार नगरपरिषदे कडे तक्रार देऊन सुद्धा कुणाच्या सांगण्यावरून व कुणाच्या वरदहस्तामुळे शासनाच्या मालमत्तेची नुकसान केले असताना महावीर शहा यांच्यावर कोणतीच कारवाई केली जात नसल्याने

तसेच त्या ठिकाणी असलेल्या काशीद जातीचे दोन झाडे तोडले असल्याने त्या बदल्यात चार झाडे वृक्ष लावणे व वृक्ष प्राधिकरण झाडाचे संरक्षण व जतन अधिनियम १९७५ नुसार त्या झाडांचे संगोपन करणे सक्तीचे आहे. तसेच त्या वृक्षारोपण केल्यानंतर प्रत्येक महिन्याला जिओ टॅगिंग फोटो संबंधित कार्यालयाला देणे बंधनकारक आहे

तसेच महावीर शहा यांनी फोटो संबंधित विभागाला दिले असल्याची चौकशी करण्यात यावी यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालय अकलूज यांच्या कार्यासमोर सामाजिक कार्यकर्ते सज्जन धोंडीबा लोखंडे,समाधान आवारे दिनांक-०८/०६/२०२३ रोजी सकाळी १०.१५ मि आंदोलन आंदोलनास बसले आहेत त्या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडल्यास महावीर शहा नगरपरिषद अकलूज चे संबंधित कर्मचारी अधिकारी यांना जबाबदार धरण्यात यावे याची गांभीर्याने नोंद घ्यावी असे निवेदनात म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button