सफाळे रेल्वे स्थानकातील रेल्वे रुळाजवळ सापडला अनोळखी पुरुष जातीचा मृतदेह

पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक.7030516640. पालघर जिल्हा वृत्तांत.
पालघर जिल्ह्यातील सफाळे रेल्वे रुळा जवळ एका अनोळखी इसमाचा रेल्वे अपघात होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना गुरुवारी दुपारी सफाळे रेल्वे स्टेशन फलाट क्रमांक एक येथे घडली आहे.
पश्चिम रेल्वेच्या सफाळे स्टेशन जवळ फलाट क्रमांक 1 जवळील रेल्वे रुळाजवळ एका अनोळखी पुरुष जातीच्या इसमाचा रेल्वे गाडीखाली अपघात होऊन जागीच मृत्यू झाला आहे. हा रेल्वे अपघात गुरुवार दिनांक 8 जून 2023 रोजी दुपारी 12 वाजता झाला आहे. या अपघातात मृत्यु झालेला इसम पुरुष जातीचा असून त्याचे अंदाजे वय (45) वर्षे आहे.
त्याची उंची 5 फूट 5 इंच असून अंगाने मध्यम रंगाने सावळा उभट चेहरा सरळ नाक पांढरे-काले केसदाढी अंगात सफेद रंगाचा फुल बाह्यांचा शर्ट हिरवट रंगाची पॅन्ट असा पेहराव असलेला हा अनोळखी इसम या इसमाबद्दल अधिक माहिती असल्यास पालघर लोहमार्ग रेल्वे पोलीस उपनिरीक्षक मुडावदकर आणि पोलीस नाईक वळवी यांच्याशी 9405379385, 8108775442 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.



