महाराष्ट्र

महाळुंग येथे उद्या रिपब्लिकन पक्षाचे वतीने रस्तारोको आंदोलन

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क

महाळुंग:-

महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसापासून दलित समजावर अन्याय अत्याचार होत आहेत नांदेड जिल्ह्यातील बोण्डर येथील अक्षय भालेराव या दलित तरुणाचा जातीवादी लोकांनी गावात भीमजयंती का केली म्हणून त्याचा निर्घृण खून केला आहे तसेच मुंबई येथे उच्च शिक्षण घेण्यासाठी आलेल्या तरुणीचा व लातूर येथे मातंग समजतील तरुणीला मारहाण या प्रकरणाचा निषेध म्हणून शुक्रवार दिनांक नऊ जून रोजी महाळुंग येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट माळशिरस तालुका उपाध्यक्ष संजय भोसले यांनी दिली आहे

केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रात सदर घटनेचा सर्वत्र निषेध आंदोलन मोर्चा काढण्यात आले प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरवदे सोलापूर जिल्हा अध्यक्ष सोमनाथ भोसले माळशिरस तालुका अध्यक्ष मिलिंद सरतापे यांच्या मार्गदर्शन खाली उद्या महाळुंग येथील रस्ता रोको आंदोलनाला सर्वानी उपस्थित राहून रस्ता रोको आंदोलन यशस्वी करण्याचे आवाहन संजय भोसले यांनी केले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button