महाराष्ट्र

महावितरण चा वर्धापन दिन महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेने काळा दिवस म्हणून केला साजरा.

उपसंपादक——- हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो़ – 97 30 867 448

महाराष्ट्रात सर्वत्र महावितरण कंपनी वर्धापन दिन साजरा आसताना मात्र जनहितशेतकरी संघटनेने आज” काळा दिवस” म्हणून साजरा केला आज महाराष्ट्र राज्यातील महावितरण कंपनीचा वर्धापन दिन साजरा होता परंतु सोलापूर जिल्हा महावितरण कार्यासमोर आज दहा दिवस झाले संगम तालुका माळशिरस येथील महावितरण अधिकाऱ्याच्या विरोधात बेमुदत धरणे आंदोलन चालू आहे यामध्ये बेजाबाबदार अधीक्षक अभियंता कार्यालयात असून आंदोलनात भेट देऊ शकत नाही ही दुर्दैवाची बाब आहे

त्यामुळे आज सोलापूर जिल्हा महावितरण कार्यासमोर महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली या महावितरणचा आज वर्धापन दिन नसून आम्ही काळा दिवस म्हणून साजरा केला अकलूज भागातील संगम गावी घडलेली घटना परिस्थिती वस्तूसथिती असताना सोलापूरचे अधीक्षक अभियंता महावितरणचे सांगळे बेजबाबदारपणे वागतात म्हणजे त्यांचा आर्थिक देवाण-घेवाण झाल्याची शक्यता नाकारता येत नाही

त्यामुळे या भ्रष्ट आणि मस्ती आलेल्या अधिकाऱ्यांला निलंबित करण्याच्या मागण्याचं निवेदन येत्या दोन दिवसात निर्णय नाही दिल्यास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन मागणी करणार असल्याचे प्रभाकर भैया देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले यावेळी आंदोलन स्थळी संगमच्या शेतकऱ्यांनी हातात बॅनर घेऊन महावितरण चा काळा दिवस साजरा करून निषेध व्यक्त केला यावेळी आकाश पराडे पाटील,संतोष पराडे पाटील शिवराम गायकवाड, संतोष शिंदे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button