शहर

शिवपांदण रस्त्यासाठी शेतकऱ्याचे अमरण उपोषण.लेखी आश्वासनाने झाली उपोषणाची सांगता..

प्रतिनिधी माया सागर पाईकराव यवतमाळ

महागाव तालुक्यातील वरोडी येथील शेतकऱ्याची शेतसर्वे नंबर 116 व 117 मध्ये शेतजमीन आहे.या शेतजमीनीस वहीती करण्यासाठी रस्ता नसल्यामुळे शेतकऱ्यास अतोनात त्रास होत असल्याने,दिनांक 23 मे 2023 रोजी मा.जिल्हाधिकारी साहेब कार्यालय यवतमाळ, उपविभागीय अधिकारी उमरखेड,व तहसील कार्यालय महागाव येथे वरोडी येथील शेतकरी मोतीराम तुकाराम अडकिने यांनी मातोश्री ग्राम समृद्धी शेत पांदण रस्ता या योजनेअंतर्गत मंजूर असलेला नवीन वरुडी ते कासारबेहळ शिवपांदण रस्ता खुला करून देण्यासाठी अर्जाव्दारे मागणी केली होती.

परंतू संबंधित प्रशासने यांच्या मागणीस कुठल्याही प्रकारे दख्खल नघेता त्याकडे दुर्लक्षीत केल्याने शेतकरी मोतीराम तुकाराम आडकिने यांनी दिनांक 31 मे 2023 रोजी उपोषण थाटले होते.

मागील तीन दिवसापासून तहसील कार्यालय समोर शिवपांदण रस्त्या करिता थाटलेल्या उपोषण मंडपास,महागांव तहसिल कार्यालयाचे तहसिलदार विश्वांबर राणे,नायब तहसिलदार सुनील देशमुख,पोलीस निरिक्षक दिपक ढोमणे,यांनी भेट देऊन शेतकऱ्यासी चर्चा करुन उपोषण सोडविण्यासाठी प्रयत्न केला यात त्यांना यश ही आले आहे.

तहसीलदार विश्वंभर राणे यांनी शेतकरी मोतीराम तुकाराम आडकिने यांच्या मागणीस 45 दिवसाच्या आत नवीन वरोडी ते कासारबेहळ हा शिवपांदण रस्ता खुला करून देण्याची कारवाई केल्या जाईल असे लेखी अश्वासन दिल्याने मोतीराम आडकिने यांनी उपोषण मागे घेतले.यावेळी उपोषण कर्त्यास विश्वंभर राणे यांनी शरबत देऊन उपोषणाची सांगता करण्यात आली.

यावेळी संदीप ठाकरे,वैद्यकीय अधिकारी डॉक्टर स्वप्नील गावंडे,मंडळ अधिकारी राम पंडित,तलाठी अनिल खडसे,मधुकर अडकिने,अक्षय भोनगुलवार अदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button