खंडाळी येथे छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिर कार्यक्रम संपन्न झाला

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क
खंडाळी येथे गुरुवार,दि.1 जून 2023 रोजी छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिर कार्यक्रम संपन्न झाला.कुशल महाराष्ट्र,रोजगारयुक्त महाराष्ट्र घडविण्याच्या उद्देशाने कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामार्फत खंडाळी (अकलूज) येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिर पार पडले असल्याची माहिती संस्थेचे प्राचार्य राजेंद्र आवडे यांनी दिली.यावेळी गटनिदेशक प्रकाश मोरे व निर्देशक वर्ग, कार्यालयीन कर्मचारी वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री. ठाकूर सर यांनी केले.

सदर आयोजित शिबिराचे उद्घाटन माळशिरस विधानसभेचे आमदार राम सातपुते यांच्या हस्ते करण्यात आले . तसेच उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, अप्पर तहसीलदार अजिंक्य गोडसे, सरपंच सौ. सुनीता सुरवसे, उपसरपंच सौ. सुरेखा पताळे, माजी प्राचार्य जोहर आवटे, खंडाळी गावातील माध्यमिक संस्थेचे मुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षक वर्ग आणि माळशिरस तालुक्यातील सर्व खाजगी आय.टी. आय. संस्थेचे प्राचार्य आणि शिक्षक वर्ग उपस्थित राहिले.

करिअर शिबिरात प्रख्यात वक्ते प्राध्यापक विजय नवले हे 10 वी 12 वी नंतर पुढे काय? या विषयावर मार्गदर्शन केले.यामध्ये ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थी,युवक-युवती व पालकांना बदलत्या काळास अनुसरून ठिकठिकाणी सुरू झालेल्या विविध शैक्षणिक व व्यावसायिक अभ्यासक्रम, प्रवेश प्रक्रिया व करिअर प्रदर्शनी आदींची माहिती दिली.

सदर कार्यक्रमास ७०० ते ८०० विद्यार्थी उपस्थित राहिले असून सर्व कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.



