पुणे शहराचे सावित्रीबाई फुले नामकरण करण्याची मागणी

बी.टी.शिवशरण
पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या जयंती कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगर चे नाव अहिल्यादेवी नगर करण्याची घोषणा केली आहे त्यांच्या घोषनेचे महाराष्ट्रातून स्वागत होत आहे त्याच धर्तीवर पुणे शहराचे विद्देची देवता सावित्रीबाई फुले असे नामकरण करावे अशी मागणी महाराष्ट्रातून जोर धरू लागली आहे
ज्या पुणे शहरातून मुलींची पहिली शाळा क्रांतिबा जोतिबा फुले व सावित्रीमाई यांनी सुरु केली त्याच पुणे शहरात जोतिबा फुले यांनी दलितांना पिण्याच्या पाण्याचा हौद खुला केला तसेच कर्मठ रूढी परंपरेने जोतिबा व सावित्रामाई यांना छळले त्रास देऊन मानसिक शारीरिक छळ केला पण त्यांनी सामाजिक शैक्षणिक वैचारिक कार्य नेटाने पुढे सुरूच ठेवले महिलांना शिक्षण सुरु करणाऱ्या थोर सामाजिक कार्यकर्त्या सावित्रीमाई फुले यांचे योगदान लक्षात घेऊन तमाम नारी जातीचा सन्मान करुन पुणे शहराला त्यांचे नाव देण्याची मागणी महाराष्ट्रातून होत आहे भारत सरकार कडे अनेकदा जोतिबा व सावित्रीमाई फुले यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्याची मागणी करूनही त्यांना पुरस्कार दिला जात नाही ही खंत आहे



