महाराष्ट्र

महेश शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त 207 रक्तदात्यांनी केले रक्तदान…

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क

अकलूज ता.माळशिरस जि.सोलापूर या ठिकाणी राहत असलेल्या मैत्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष महेश शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे वर्ष 4 थे मैत्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य मार्फत रक्तदानाचे चे आयोजन करण्यात आले होते.यावेळी तब्बल 207 रक्तदात्यांनी रक्तदान केले.महेश शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मैत्री प्रतिष्ठान यांनी सलग 4 थ्या वर्षी तर 207 रक्तदात्यांनी रक्तदान करून महेश शिंदे व्यक्तिमत्व हे कार्यक्षम कृतिशील व मैत्रीसम्राट आहे हे सिद्ध केलं.

यावेळी महेश शिंदे असे म्हणाले की मी केलेल्या समाज कार्याची पोचपावती मला मिळालीच पण कार्याच्या व मैत्रीच्या जोरावर माझी यशस्वी वाटचाल चालत आहे.तसेच माझ्यासोबत माझे सामाजिक बंधू व माझे मित्र परिवार आहे तोपर्यंत मला विजय मिळवत च जाईल यावेळी कार्यक्रमासाठी आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते माळशिरस चे माजी सरपंच मा.विकास दादा धाईंजे, नॅशनल दलीत मूव्हमेंट फोर जस्टिस संघटनेचे राज्य सचिव वैभव जी गीते , राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्हा सरचिटणीस किरन जी साठे ,बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य काकासाहेब जाधव, राष्ट्रवादी अल्पसंख्याक जिल्हा सरचिटणीस साजिद भाई सय्यद,युवा सेने चे युवा नेते भूषणभैया पराडे पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अश्विनी भानवसे मॅडम, शिवसेना सोल जि उपाध्यक्ष दीपक भाऊ खंडागळे,बहुजन ब्रिगेडचे अकलूज शहर प्रमुख उदय कांबळे, व सर्व सामाजिक संघटनांनी व सर्व पक्षांनी येऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व मैत्री प्रतिष्ठानचे पदाधिकारी प्रविण निकम,दुर्योधन गायकवाड,सोहम बोडके,शंकर मस्के,ऋषिकेश जाधव,अक्षय गायकवाड, सनी गायकवाड,सूरज दिवटे,निता सुळे,गणेश भालशंकर, संजय वाघमोडे, तुषार मोरे,अभि बिटे,ओंकार गायकवाड,अमित वसव,संदीप वाघमारे,शुभम गायकवाड, आदित्य माने सहकारी यांनी परिश्रम घेतले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button