डहाणू धुंदलवाडी वेदांत मेडिकल कॉलेजच्या प्राचार्यांनी विद्यार्थिनीकडे डॉक्टरी परीक्षा पास करण्यासाठी केली शरीर सुखाची मागणी …..प्राचार्या विरोधात कासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक.7030516640. पालघर जिल्हा वृत्तांत.
पालघर जिल्ह्यातील डहाणू धुंदलवाडी येथील वेदांत मेडिकल कॉलेजमध्ये एम.बी.बीएसचे शिक्षण घेणाऱ्या (21) वर्षीय विद्यार्थिनीकडे शरीर सुखाची मागणी आणि तिचा विनयभंग करणाऱ्या प्राचार्या विरुद्ध कासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मूळची नागपूर येथील राहणारी ही (21) वर्षीय विद्यार्थिनी पालघर जिल्ह्यातील डहाणू धुंदलवाडी येथील वेदांत मेडिकल कॉलेज मध्ये प्रथम वर्षासाठी डॉक्टरी शिक्षण घेत आहे. या डॉक्टरी परीक्षेत पास होण्यासाठी मी सांगेन ते करावे लागेल असे सांगून या मुलीकडे या प्राचार्याने शरीर सुखाची मागणी केली याबाबत या मुलीने या प्राचार्यांची महाविद्यालयातील प्रशासनाला व कासा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर या प्राचार्यांच्या विरोधात कासा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



