जनहित शेतकरी संघटनेचे सोलापूर महावितरण कार्यालयासमोर संगम ता.माळशिरस महावितरण अधिकाऱ्यांच्या विरोधात 29 मे पासुन बेमुदत धरणे आंदोलन

उपसंपादक—— हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448
महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापुर येथील अधीक्षक अभियंता महावितरण कार्यालया समोर संगम ता. माळशिरस जि. सोलापूर यांच्या विरोधात जनहित शेतकरी संघटनेचे बेमुदत धरणे आंदोलन करणार आहेत संगम ता माळशिरस येथील 33/ 11 के व्ही चे वीज उपकेंद्र संगम गावातील काही व्यक्तीनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून बेकायदेशीररित्या बंद केल्याबाबत बेमुदत धरणे आंदोलन सोमवार दि 29 रोजी होणार आहे

संगम ता.माळशिरस येथील विद्युत 33/ 11 के व्ही वीज उपकेंद्र 05/04/2023 रोजी सायंकाळी 7.00 वा सुमारास संगम गावास वेठीस धरुन बंद करण्यात आले होते त्या उपकेंद्राचे अधिकारी व संगम गावातील 5 इसमावर व त्या ठिकाणच्या महावितरण अधिकारी व कर्मचाऱ्यांवर भारतीय दंड संहिता व विद्युत अधिनियम कायदा 2003 अन्वये घटनेच्या विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यासाठी

गावातील 50 नागरिकांच्या सह्याचे निवेदन सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांच्या मार्गदर्शना खाली दि 17 मे रोजी देण्यात आले होते यावेळी जनहित शेतकरी संघटनेचे आकाश पराडे पाटील, अमोल पराडे पाटील, प्रशांत पराडे पाटील,शिवराम गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते




