महाराष्ट्र

कुर्डूवाडी शहरातील 917 मिळकत धारकांचा प्रश्न माजी आमदार नारायण पाटील यांच्या काळातच सुटला, विद्यमान आमदार महोदयांनी या प्रश्नाचे राजकारण केले

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60

कुर्डूवाडी शहरातील 917 मिळकत धारकांचा प्रश्न माजी आमदार नारायण पाटील यांच्या काळातच सुटला, विद्यमान आमदार महोदयांनी या प्रश्नाचे राजकारण केले असा घणाघाती आरोप पाटील गटाकडून करण्यात आला. कुर्डूवाडी शहरातील 917 मिळकत धारकांचा प्रश्न आता मार्गी लागला असून याबाबत आजी माजी आमदारांकडून श्रेय घेण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.

याबाबत सविस्तर माहिती देताना पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी सांगितले की कुर्डूवाडी शहरातील 917 मिळकत धारकांचा प्रश्न हा काही 2019 नंतरचा नाही. सन 2014 च्या आधी पासून सदर 917 मिळकत धारक हे न्याय मागत होते. परंतू त्यावेळी नगरपालिका व शिंदे बंधूंनी या प्रश्नाकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष केले. यानंतर सन 2014 पासून पुढे तत्कालीन आमदार नारायण पाटील यांनी हा प्रश्न सोडवण्यासाठी हाती घेतला.

या प्रश्नावर मंत्रालयीन पातळीवर चर्चा घडवून आणण्यासाठी संबंधित विभागाचे अधिकारी व मंत्रीमहोदय यांच्या उपस्थितीत बैठकांची मागणी केली. सदर बैठकींसाठी कुर्डूवाडी शहरातील प्रमुख कार्यकर्त्यांचे एक शिष्टमंडळ मुंबई येथे घेऊन जाऊन हा प्रश्न पोटतिडकीने मंत्रीमहोदयांसमोर मांडला. विधानसभेच्या अधिवेशनांमध्ये हा प्रश्न तारांकीत करुन उपस्थित केला. यानंतर जिल्हाधिकारी यांना वरिष्ठ पातळीवरुन आदेश देण्यात आले व नंतर पुढील बैठक सोलापुर येथे पार पडली.

या बैठकीस सुद्धा कुर्डूवाडी शहरातील शिवसेना व भाजपाचे पदाधिकारी यांना निमंत्रित करुन सर्वासमक्ष हा प्रश्न सोडवण्यासाठी माजी आमदार नारायण पाटील यांनी प्रयत्न केले. जिल्हाधिकारी यांच्या समवेत झालेल्या बैठकीनंतर मात्र या 917 पैकी बहुतांश प्रकरणे सुटण्यास सुरवात झाली. यातील शेकडो मिळकत धारकांना तात्काळ न्याय मिळाला. परंतू नंतर मिळकत धारकांकडून काही तांत्रिक बाबींची व कागदोपत्रांची पुर्तता न झाल्याने काही प्रकरणे रखडली गेली.

सन 2019 नंतर मात्र सत्तांतर झाल्याने विद्यमान आमदार संजयमामा शिंदे यांनी जाणीवपूर्वक तीन वर्षे हा प्रश्न रखडवत ठेवला. मंत्रीमहोदय व जिल्हाधिकारी यांचे या कामाबाबत प्रांत कार्यालयास 2019 पुर्वीच आदेश प्राप्त आहेत. यावेळी सदर प्रश्न जिल्हाधिकारी महोदयांच्या लक्षात आणून देण्याचे बाकी होते. आमदार महोदय हे महाविकास आघाडीच्या सरकारला पाठींबा देणारे आमदार असल्याने हा प्रश्न तोंडी आदेशानुसार मार्गी लागला असता.

पण हा प्रश्न सोडवण्यासाठी आमदार संजयमामा शिंदे सकारात्मक नसल्याने 917 पैकी उर्वरीत मिळकत धारकांना न्याय मिळत नव्हता. आणि मग आजमितीस हा प्रश्न आपण विधानसभेत मांडला.या प्रकरणी बड्या नेतेमंडळींनी कसे सहकार्य केले असे सांगून विद्यमान आमदार महोदय हे हा प्रश्न अधिक अवघड असल्याचे भासवू पाहत आहेत.

पण प्रत्यक्षात तसे काही नसून माजी आमदार नारायण पाटील यांनी 917 मिळकत धारकांचा प्रश्न त्यांच्या कालावधीतच मार्गी लावला होता. यातील तांत्रिक अडचण सोडवण्यासाठी विद्यमान आमदार संजयमामा शिंदे यांनी तब्बल तीन वर्षे घेतली व मिळकत धारकांना न्याय मिळवून देण्यास कृत्रीम अडचणी निर्माण करुन दिरंगाई केल्याचा गंभीर आरोप पाटील गटाकडून प्रवक्ते सुनील तळेकर यांनी केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button