महाराष्ट्र

1500 रुपयांची लाच स्वीकारताना विरार पोलीस ठाणे महिला पोलीस हवालदार समीक्षा मोहिते…. पोलीस उपअधीक्षक नवनाथ जगताप यांच्या जाळ्यात अटक

पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक. 7030516640. पालघर जिल्हा वृत्तांत

विरार येथील दोन भावांमध्ये झालेल्या भांडणांमध्ये एका भावाने दुसऱ्या भावाविरुद्ध विरार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. परंतु या दोन भावांमध्ये समझोता झाल्यावर पोलीस ठाण्यातच ही तक्रार मिटवण्यासाठी व या पैकी एका भावावर प्रतिबंधात्मक कारवाई न करण्यासाठी 1500 रुपयांच्या लाचेची मागणी करून 1000 रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी विरार पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस हवालदार समीक्षा संतोष मोहिते यांना अँटी करप्शन ब्युरो पालघर युनिट पोलीस उपअधीक्षक नवनाथ जगताप यांच्या पथकाने शुक्रवारी रंगेहात अटक करून विरार पोलीस ठाण्यात या पोलीस हवालदार महिले विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

विरार येथील दोन भावांमध्ये भांडण झाल्यावर एका भावाने दुसऱ्या भावाविरुद्ध विरार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. परंतु यानंतर या दोन्ही भावांमध्ये समझोता झाल्यावर या दोन्ही भावांनी विरार पोलीस ठाण्यातील महिला पोलीस हवालदार समीक्षा संतोष मोहिते यांना विनंती केली की आमचे भांडण आम्ही आपसामध्ये मिटवून समझोता केला आहे.तरी आपण माझ्या भावावर कारवाई करू नये अशी विनंती केल्यावर हे प्रकरण विरार पोलीस ठाण्यातच मिटवून प्रतिबंधात्मक कारवाई न करण्यासाठी या दोन भावांकडे विरार पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस हवालदार समीक्षा संतोष मोहिते यांनी 1500 रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

याबाबत (53)वर्षीय तक्रारदार यांनी या महिलेची अँटी करप्शन ब्युरो कार्यालय पालघर येथे तक्रार दाखल केल्यावर या कार्यालया मार्फत या प्रकरणाची पडताळणी करण्यात आल्यावर श्री.सुनील लोखंडे अँटी करप्शन ब्युरो पोलीस अधीक्षक ठाणे परिक्षेत्र व श्री.अनिल घेरडीकर अप्पर पोलीस अधीक्षक ठाणे परिक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली अँटी करप्शन ब्युरो पालघर युनिट पोलीस उपअधीक्षक नवनाथ जगताप,पोलीस निरीक्षक स्वपन बिश्वास, महिला पोलीस हवालदार स्वाती तारवी, पोलीस हवालदार अमित चव्हाण, नितीन पागधरे, नवनाथ भगत, संजय सुतार,विलास भोये,योगेश धारणे, दीपक सुमडा या पथकाने शुक्रवार दिनांक 19 मे 2023 रोजी दुपारी 03. 55 वाजता सापळा रचून पंचा समक्ष विरार पोलीस ठाणे महिला हवालदार समीक्षा मोहिते यांना तक्रारदार यांच्याकडून एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक करून विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button