शिवांजलीच्या अभंग गवळणी,आणि गजलने पंढरपूरकर कला रसिक तल्लीन.संतप्रसाद शिक्षण संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळाव्याने विद्यार्थी झाले भाऊक

अकलज प्रतिनिधी शकुर तांबोळी
पंढरपूर:-संतप्रसाद शिक्षण संस्थेचे श्रीसंत गाडगेबाबा गयामाता निराधार बालकाश्रम पंढरपूर वै.दादा महाराज मनमाडकर यांच्या ४००-ते ५०० आश्रम शाळेतील माझी विध्यार्थ्यांचा(गेट टुगेदर) स्नेहसंमेलनात उदयोन्मुख गायिका शिवांजली शिवाजी आदलिंगे हिचे गायन झाले.
सुरुवातीला स्नेहसंमेलनात मा.आमदार प्रशांत मालक परिचारक, भगवान भाऊ मनमाडकर(आरती साउंड सर्वीस चे सर्वेसर्वा),सौ.शोभागीताई (माई) भगवान मनमाडकर, नगरसेवक अनिल डोके,प्रा.अरुन गंभीरे, शिक्षणाधिकारी शोभा राऊत, भगवान माने सर संत गाडगेबाबा विध्या मंदीर चे शिक्षक मा.वाघमारे सर,हुंगेसर,मानेसर यांच्या उपस्थितीत गयामाता व दादा महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

आणि अनेक वर्षांनी गरिबीच्या काळात बसलेले चटके त्यातून ताऊनसुलाखून निघून संसाराचा गाडा चांगल्याप्रकारे चालवून समाजाच हित जपण्याचं काम आपल्या सर्वांच्या कडून होतंय यांचा आनंद या भेटीत सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होता, सायंकाळी आश्रमातील माझी विद्यार्थी शिवाजी आदलिंगे बालमित्राच्या मुलीने गायन क्षेत्रात नाव उमटवत असताना तिची एक संगीत मैफिल या कार्यक्रमासाठी आलेल्या बालमित्रासाठी स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आली होते

आणि त्यामध्ये शिवांजली आदलिंगे हिने विठूरायाच्या सुंदर ते ध्यान उभे विटेवरी वरी या अभंगरचनेने सुंदर सुरुवात झाली.त्यानंतर बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल,भेटी लागी जीवा,सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या,मी राधिका,राधे तुला पुसतो घोंगडी वाला,गझल अशा विविध गायनशैलीत गायन करून रसिकश्रोत्यांच मने जिंकली.पुण्यातील विद्या खांडवे यांचेकडे गायनाचे धडे गिरवत असताना एवढ्या लहान वयात अतिशय सुंदर तयारी करत आहे.
त्यांना तितकीच अप्रतिम साथसंगत हार्मोनियम वैभव केंगार पखवाज ज्ञानेश्वर दुधाणे तबला ज्ञानेश्वर खरात टाळ शरद जाधव सुदर्शन कुंभार यांनी केली.तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शोभाताई मनमाडकर यांनी केले.या कार्यक्रमासाठी ध्वनीव्यवस्था भैय्या मनमाडकर यांनी सुंदर सांभाळली,या सुंदर कार्यक्रमाचे सुंदर आयोजन भगवानभाऊ नारायणबाबा मनमाडकर केले होते.स्नेह संमेलन यशस्वी करण्यासाठी धनंजय भैय्या मनमाडकर सुदाम भोपळे,राजू ढवण,लक्ष्मण सुळे,राजू धर्माधिकारी, तुकाराम आदींनी अधिक परिश्रम घेतले



