वैराग येथील विद्यामंदिर हायस्कूल मध्ये तीस वर्षानंतर 70 विद्यार्थ्यांची भरली शाळा–1993 मधील दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा.

उपसंपादक ——–हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448
दहावीत अभ्यासाचा ताण असतानाही स्वच्छंदपणे केलेली दंगा मस्ती शिक्षकांचा धाक अन् आदरपूर्वक भीतीतून केलेला अभ्यास यामुळे सर्वजण यशस्वी झाले पुढील शिक्षणानंतर प्रत्येक जण आपापल्या नोकरी व्यवसाय शेती याबरोबर संसारात गुंतून गेले. काही जनाचे समाजमाध्यमातून थोडेफार बोलणे व्हायचे वैराग मधील विद्यामंदिर हायस्कूल मधील 1993 च्या दहावीच्या बॅचचे 70 विद्यार्थी व शिक्षक तीस वर्षानंतर आठवणीत दंग झाले निमित्त होते स्नेह मेळाव्याचे मुंबई, पुणे ,संगमनेर ,कोल्हापूर , सोलापूर अशा विविध भागातून सवंगडी जमली होते .संदीप बेताळे व इस्माईल पटेल यांनी आयोजन केले.

येथील विद्यामंदिर हायस्कूलच्या १९९३ मधील दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन स्नेहमेळावा भरविला. तब्बल तीस वर्षानंतर एकत्र आलेल्या या मित्र मैत्रिणीचे पुन्हा एकदा जणू शाळा भरली.यावेळी त्यांनी आपल्या जुन्यानव्या आठवणींना उजळा देत छडी लागे छम छम… विद्या येई घम घम… म्हणत शालेय मैत्रीचे ऋणानुबंध जागविला.

सर्व जिवलग व निरपेक्ष मित्र मैत्रिणींचे एकत्रित भेट झाली हे स्वप्नवत आहे यावर विश्वासच बसत नाही जवळपास सर्वच मित्र मैत्रिणी एवढ्या दूरवरून आले कसे सहा तास घालवले कळले पण नाही आपले सर्व मित्र मैत्रिणी चांगल्या नोकरीवर चांगल्या व्यवसायावर चांगल्या शेतीवर काम करत आहेत आपले मित्र मैत्रिणी प्राथमिक ,माध्यमिक, उच्च माध्यमिक ,पदवी, पदव्युत्तर, शिक्षक ,मुख्याध्यापक ,उपप्राचार्य, प्राचार्य, शिक्षण ,संस्थापक ,(लोको)रेल्वे ,पायलट ,इंजिनियर, डॉक्टर ,आयटी मॅनेजर ,वकील, बँक मॅनेजर, क्लर्क, बांधकाम व्यावसायिक ,बांधकाम मॅनेजर’ हॉटेल व्यवसायिक ,आधुनिक शेतकरी ,किराणा व्यवसायिक, कोर्ट कर्मचारी ,नगर अभियंता, हॉस्पिटल टेक्निकल अधिकारी, इन्शुरन्स एजंट ,औषध निर्मिती, तज्ञ गृहिणी ,इत्यादी आपापल्या जबाबदाऱ्या सांभाळत असताना एवढे सर्वजण एकत्र येऊन गेट-टुगेदर हा कार्यक्रम उत्साहात साजरा झाला

याप्रसंगी त्यावेळीचे शिक्षक विश्वनाथ भोई, दिलीप सोपल, श्यामराव पवार, कल्याण करंडे, शरद जाडे, महेश कांबळे, कालिदास शिंदे, सिद्धू पाटील, शिक्षिका कस्तुरी दराडे दमयंती जगदाळे, सुरेखा घुगे, कांत कुलकर्णी, जयश्री करपे आदींची प्रमुख उपस्थितीमध्ये होती प्रास्ताविक दीपा कुलकर्णी यांनी केले. प्रारंभ दिवंगत शिक्षक व विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी माजी विद्यार्थीनीं आपल्या भावना व्यक्त केल्या. शिक्षकांनीही आपले मनोगत व्यक्त केले. सकाळी सर्वांची ओळख, मनोगत, संध्याकाळी समारोप सभा, सत्कार समारंभ असे भरगच्च कार्यक्रम पार पडले प्रास्ताविक दीपा कुलकर्णी सूत्रसंचालन मनीषा देशमुख यांनी केले केले तर आभार संध्या मोतीने यांनी मानले.
संदीप बेताळे व इस्माईल पटेल यांनी व्हाट्सअप , फेसबुक,सोशल मीडिया माध्यमातून संपर्क साधून स्नेह मेळाव्याचे आयोजन केले .




