डीआरडीओ चा संचालक प्रदीप कुरुलकर याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा: उत्तरेश्वर कांबळे

करमाळा प्रतिनिधी: अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पुर्णवेळ कार्यकर्ता आणी डीआरडीओ च्या संशोधन व विकास संस्थेचा संचालक डॉ प्रदीप कुरुलकर याने पाकिस्तानला मेल पाठवून संदेशाची देवाण-घेवाण केली असल्याचे निष्पन्न झाले आहे गुगल कंपनीने या संबंधित अहवाल दिला असल्याचे दहशतवादी विरोधी पथकाने न्यायालयात सुनावणी दरम्यान सांगितले आहे.
प्रदीप कुरुलकर याने काही महत्त्वाचे फोटो शेअर केले असल्याचे समोर आले आहे.सविस्तर माहिती अशी की कुरुलकर याला गेल्या वर्षी जुलै महिन्यात एक मेसेज आला होता मेसेज करणा-या महिलेने ती लंडनची रहिवासी असल्याचे सांगितले होते परंतू सदरची महिला ही पाकिस्तानी असल्याची समजते त्यानंतर कुरूलकरने त्या महिलेशी बोलणे वाढवले कारण वयाच्या 59 वर्षी त्याला एकटे वाटत होते .
त्या महिलेला क्षेपणास्त्राविषय आवड होती याची माहिती दिल्यास ती आपल्यासाठी काहीही करेल असे कुरुलकरला वाटले तीचे नग्न व्हिडिओ पाहता यावेत म्हणून महिती पुरवली असल्याची माहिती समोर आली आहे.पाकीस्तानी गुप्तचरांच्या हस्तकाला गोपनीय माहिती पुरवून प्रदीप कुरुलकर याने देशाशी गद्दारी केली आहे म्हणून त्याच्यावर देशदोहाचा गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करण्याची मागणी भीम आर्मी संविधान रक्षक दलाचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष उत्तरेश्वर कांबळे यांनी पोलिस महासंचालकांकडे निवेदनाव्दारे केली आहे.



