कर्नाटक मध्ये “भाजपा” च नाटक चाललं नाही- बजरंगबली भा.ज.पा.वर नाराज तर काँग्रेस वर खुष —महेश कोळेकर

उपसंपादक -हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448
निवडणूका म्हंटल की हार जित होणारच…! संपूर्ण भारत देशाच लक्ष लागल होत कर्नाटक च्या निवडणूक मध्ये आणि आज त्या निवडणुकांचा निकाल ही संपूर्ण जनता पाहत आहे. काँग्रेस ने मोठ्या प्रमाणात बाजी मारलेली दिसत आहे. भाजप मात्र पिछाडीवर आहे. एक एक सीट घसरललेली दिसत आहे. मग जाती धर्माच राजकारण कोणाला पचल नाही. आणि विकासाच स्वप्न पूर्ण करायचं कोणाला सुचलं नाही. हे कर्नाटक मधील तमाम जनतेने दाखवून दिलेलं आहे.

अस म्हणायला काहीच हरकत नाही. इकडे महाराष्ट्र मध्ये राजकीय बोंबाबोंब सुरू असताना. सत्तासंघर्ष चा निकाल लागला असताना. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चा राष्ट्रीय दर्जा काढून घेतला असताना. किती किती परिणाम झाला पाहायला मिळतोय कर्नाटक मध्ये. पण खरं तर राहुल गांधींनी जी भारत जोडो यात्रा काढली त्याचा आणि भाजपा हटाव, देश बचाव, संविधान बचाव यामुळे या निवडणुकीत घवघवीत अस यश काँग्रेस ला मिळालेलं आहे. त्यातच नवीन राष्ट्रीय अध्यक्ष आणि बरच काही. आणि त्यातच नुकताच रिलीज झालेला द केरळ स्टोरी नावाचा चित्रपट या सर्व गोष्टींचा या मतदान प्रक्रियेत खूप मोठ्या प्रमाणात प्रभाव पडलेला दिसून येतो आहे. नेहमी सत्तेची उलथापालथ ही होत असते.

शांत दिसणाऱ्या लाटा ही मोठं मोठी जहाजे बुडवण्याचं सामर्थ्य ठेवत असतात. आपला भारत देश अनेक जाती धर्मांनी नटलेला हा भारत देश आहे. त्याच ही राजकारण काही लोकांनी राजकिय मंडळींनी केलं. पण सुसंस्कृत मतदार हे सर्व ओळखून बघूनच मतदान करीत असतो. हे मात्र तितकंच खरं आहे. काही नाटकी राजकीय माणसे आपल्या फायद्यासाठी मतांसाठी खूप काही करतात. खुर्चीसाठी कशाचाही वापर करतात. पण या भारत देशातील प्रत्येक मतदार मात्र आता हुशार बनलेला आहे. कोण विकास करतो आणि कोण विकासाच नाटक करत हे सर्वानी जाणलं आहे.

हा फक्त कर्नाटक या राज्याचा निकाल नाही तर संपूर्ण देशाचं राजकीय परिवर्तन सुरुवात अस ही म्हणायला काही वावग ठरणार नाही. माझा देश बदलतोय अस कर्नाटक मधील जनता म्हणत आहे. आज संपूर्ण कर्नाटक राज्य राजकीय वातावरणात ढवळून निघालं आहे. धुवून निघालं आहे. एकीकडे जल्लोष तर दुसरीकडे भयानक शांतता पसरली आहे. हा खेळ सारा सत्तेचा, मोह नको खुर्चीचा अस काहीसं म्हणावं लागेल. हा देश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानावर चालतो.

हा भारत देश सुसंस्कृत अशा नागरिकांचा देश म्हणून ओळखला जातो. कृषिप्रधान भारत देशात महासत्ताक होण्याचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर बदल आणि परिवर्तन हे हवंच अस मला प्रामाणिकपणे वाटत. येणाऱ्या सरकार कडून नागरिकांना याच अपेक्षा असतील. की बेरोजगारी नष्ट होईल, उद्योगधंदे ला चालना मिळेल. तरुणांच्या हाताला काम मिळेल. शेतकरी सुखात नांदेल. संपूर्ण राज्याचा विकास होईल. आणि महासत्ताक भारत देशाच्या वाटचालीत कर्नाटक राज्याच एक पहिलं पाऊल असेल.
लेखक-महेश बजरंग कोळेकर
रा-काक्रंबावाडी ता-तुळजापूर जि-धाराशिव.
मो.नं- 9579228347/9146133047