महाराष्ट्र

निमगाव केतकी तालुका इंदापूर येथे इंदापूर तालुका मुस्लिम चॅरिटेबल ट्रस्ट आणि मुस्लिम युवक संघटनेच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन

उपसंपादक——- हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो . 97 30 867 448

निमगाव( केतकी )ता. इंदापूर जि.पुणे येथे इंदापूर तालुका मुस्लिम चारिटेबल ट्रस्ट व तालुका मुस्लिम युवक संघटनेच्या वतीने सोमवार दिनांक 15 मे 2023 रोजी दुपारी 1/45 वाजता केतकेश्वर मंगल कार्यालय निमगाव( केतकी )(इंदापूर– बारामती रोड )येथे सामुदायिक विवाहाचे आयोजन केले असल्याची माहिती मुख्तार मुलाणी यांनी दिली असुन

या सामुदायिक विवाह सोहळ्यात 10 जोडप्यांचे विवाह संपन्न होणार आहेत या सामुदायिक विवाह निमित्त इंदापूर तालुका मुस्लिम चॕरिटेबल ट्रस्ट व मुस्लिम युवक संघटनेच्या वतीने प्रत्येक जोडप्यास संसार उपयोगी प्रत्येकी 5/5 भांडी एक कपाट वधूवरांना प्रत्येकी 1 पोशाख वधुस चप्पलजोड वरास बूट(शुज) वधू-वरांना सेहरा (बाशिंग )प्रत्येक वधूला 1 बुरखा तसेच पवित्र ग्रंथ कुरान शरीफ ची प्रत्येकी 1 प्रत देण्यात येणार आहे

तसेच या विवाह करता प्रत्येक जोडप्याकडून अनामत रक्कम म्हणून 5000/-रुपये स्वीकारले जातात आणि विवाह सोहळ्यानंतर ही 5000/-रुपये ची रक्कम वधूच्या आईला परत दिली जाते शिवाय विवाह सोहळ्यास उपस्थित राहणाऱ्या वऱ्हाडी मंडळी व पाहुण्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे अशाप्रकारे या ट्रस्टच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे .या सामुदायिक विवाहात 10 जोडप्यांचे विवाह लावण्यात येणार असून त्या वधू-वरांची नावे

पुढीलप्रमाणे–

  1. वर– अनिस शेख रा.काटी,– वधू –नाजिया शेख ,रा.काटेवाडी 2)वर –सोहेल मुलाणी ,रा.सांगोला –वधू –मुस्कान मुलाणी, अकलूज 3)वर- समीर शेख ,रा.बावडा वधू –नाजमीन शेख ,,(निमगाव केतकी ) 4) वर– जमीर शेख,– अकलूज ,वधू –सानिया सय्यद रा. अकलूज 5) रियाज मुलाणी , रा. निमगाव (केतकी) वधू- आरिफ पठाण रा. शेळगाव 6) वर,- हबीब मुलाणी,रा. अकोले , वधू –जरीना काझी रा. शेटफळ हवेली 7) वर- मुनकीर पठाण रा. लुमेवाडी ,–वधू –सना पटेल रा.टेंभुर्णी 8)वर –नवाज शेख,- बावडा वधू -करिष्मा मुलाणी , रा.लासुर्णे 9 )वर– आरिफ शेख ,–बालाजीपुरा –वधू- सानिया सय्यद रा.भवानीनगर 10 )वर –शाहरुख पठाण,रा. राशिन –वधू सानिया शेख -रा.बावडा याप्रमाणे या 10 जोडप्यांचे विवाह संपन्न होणार आहे.

या विवाह सोहळ्यास इंदापूर ,माळशिरस, बावडा, अकलूज ,निमगाव केतकी, काटेवाडी, परिसरातील नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहून वधू-वरांना शुभाशीर्वाद द्यावेत असे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button