कु.तनिका मगर हिचा पहिला वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा.

उपसंपादक—–हुसेन मुलाणी
टाइम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
मो..9730 867 448
माळशिरस तालुक्यातील निमगाव (म) येथील नागनाथ नेताजी मगर व त्यांच्या सुविधा पत्नी सौ. तेजस्विता नागनाथ मगर यांनी आपल्या कन्या कु.तनिका हिचा पहिला वाढदिवसानिमित्त विशेष उपक्रम राबवत समाजापुढे एक नवा आदर्श ठेवत साजरा केला आहे.

आज सगळीकडे लोक आपल्या मुलांचे वाढदिवस मोठ मोठ्या हाॅटेल्समध्ये धुमधडाक्यात साजरे केले जातात.त्यामुळे काही क्षणी आनंदासाठी हजारो रूपयाचे खर्च केला जातो.त्यापेक्षा हा अनावश्यक खर्च होणारा पैसा योग्य ठिकाणी व चांगल्या कामासाठी केला तर मनाला वेगळाच आनंद मिळतो.हे लक्षात घेऊन आपल्या कन्येचा वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचे निमगाव घ्या नागनाथ मगर परिवाराने ठरविले.त्याप्रमाणे पंढरपूर येथील निराधार बालकांच्या सानिध्यात ठरविले.

पंढरपूर येथील प्रभा-हिरा प्रतिष्ठान संचलित पालवी विशेष बालकांचा संगोपन प्रकल्प येथे बालकांसाठी दुपारचे भोजनाची व्यवस्था व फळांचे वाटप कु.तनिकाच्या हस्ते करण्यात आले.यावेळी पालवीच्या संचालिका मंगल शहा,डिंपल घाडगे,शितल वाघ,नेतजी सुखदेव मगर,सौ.शांता नेताजी मगर,पै.सोमनाथ मगर,दिपक देवकर,गणेश नागणे,पप्पू शिंदे, डॉ.यशवंत रणदिवे (सातारा), डॉ.सौ.विद्यादेवी यशवंत रणदिवे व अक्षय रणदिवे उपस्थित होते.
नागनाथ मगर यांचे शिक्षण एम्.फार्मसी झाले असून पुण्यात आय.टी.कंपनीत जाॅबला आहेत.त्यांनी तनिकाच्या वाढदिवसानिमित्त नियोजन केलेल्या भोजन व फळे वाटपाच्या कार्यक्रमामुळे माझ्या परिवारातील सदस्यांना एक वेगळ्या दुनियाचा अनुभव व मनाला आनंद मिळाला आहे.तरी लोकांनी आपल्या मुलांचे वाढदिवस साजरे करताना आपल्या आयुष्यातील एक दिवस अशा निराधारांच्या सानिध्यात राहून त्यांच्या जीवनातील आनंदाचे क्षण आणावेत व त्याचे भागीदार आपन व्हावे.




