महाराष्ट्र

एक प्रेमपत्र…अहो प्रेमपत्र कसलं जिवंत हृदयाच्या भावना आहेत त्या….

टाइम्स 9 मराठी न्युज नेटवर्क

प्रिय,
सगळेजण एकमेकांवर प्रेम करतात. तसच मी ही तुझ्यावर प्रेम केलंय. माझं तुझ्यावर प्रेम करणं चुकीचं असेल तर प्लिज मोठ्या मनाने मला माफ कर. अस म्हणतात आयुष्यात माणसाने एकदातरी प्रेम करावं. कोणासाठी तरी झुराव. आपलं ही काळजी घेणार कोणीतरी असावं. पण अलीकडे मुळात ही प्रेम नावाची संकल्पना च खराब होत आहे लोकांचा त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन ही बदलत आहे. अनेक कारणे आहेत त्याला. राधा कृष्णाचं ही प्रेम होतं, बाजीराव मस्तानी च ही प्रेम होतं. आणि तसच आपलं ही आहे. आपण ज्या महाराष्ट्रात राहतोय त्या तो महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज यांचा महाराष्ट्र आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालणारा हा आपला महाराष्ट्र आहे. तमाम माता भगिनींचा मानसन्मान राखणारा हा महाराष्ट्र आहे. याच आपल्या सर्वांना भान असायला हवे. पण अलीकडे याच महाराष्ट्र मध्ये अनेक वाईट गोष्टी घडताना दिसून येत आहेत. प्रेमाच्या नावाखाली अनेक अनुचित प्रकार ही घडत असताना दिसून येत आहेत. काल्पनिक जगात जगताना खूप मजा येते ना. कारण तिथं सगळं आपण आपल्या बाजूनी विचार करत असतो. पण काही गोष्टी पाहता आपण विचार करायला हवा. आजकाल चे तरुण आपल्या प्रियसीला आकर्षित करण्यासाठी किती जीवाचा अट्टहास करतात.

किती मोठ बोलतात, कोण मोबाईल च्या स्टेटस, स्टोरी , च्या तरी कोणी आपल्या लेखणीच्या कवितेच्या , पत्राच्या, लेख च्या माध्यमातून व्यक्त होत असतात. पण एक सांगू मित्रांनो, सगळेजण सारखेच नसतात. कोण रूप पाहुन, कोण संपत्ती पाहून तर कोण स्वभाव पाहून प्रेमात पडत. एक सरळ सरळ विचार करायचा गेला तर एका मुलीला मुलांकडून काय अपेक्षा असतात चंद्र सूर्य तारे आणून द्यायच्या नसतात. तर त्या मुलीची फक्त एवढीच अपेक्षा असते की तिच्यावर येणाऱ्या प्रत्येक संकटात त्या मुलाने सर्वात पुढे उभं रहावं. प्रत्येक सुखदुःखात त्या मुलीच्या कायम सोबत रहावं.

मग एखादा मुलगा एखाद्या मुलीला अस ही म्हणून आपलं प्रेमभाव पत्राच्या, कवितेच्या माध्यमातून व्यक्त करू शकतो. जस की, “मी बाकी मुलांसारखं तुला अस म्हणणार नाही की, चंद्र,तारे आणून देईल पण तुझ्या प्रत्येक अडचणीत, दुःखात मी सर्वात पुढे उभा असेल. तुझं कधीही मन दुखावणार नाही. तुझी काळजी घेईन. बस्स एका खर प्रेम करणाऱ्या मुलीला काय हवं असत या व्यतिरिक्त. आपण ही यावर थोडासा विचार करायला हवा. प्रेमाचं अलीकडे रूप ही बदलताना दिसून येत आहे. पत्र एक कागद की चिट्ठी….किती व्यापक अर्थ पहायला मिळतो यामधून ना…

गावाकडे प्रेम केलं तर लफडं, गावाकडे प्रेमपत्र दिले तर चिट्ठी आणि शहरात प्रेम केलं तर प्रेम आणि प्रेमपत्र दिल तर लव्ह लेटर म्हणून त्याचा नावाजल जात. पण काहीपण म्हणा अलीकडे लोकांचा या प्रेमपत्राकडे हा तुमच्या भाषेत चिट्ठी कडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत आहे. काय होत भावना व्यक्त करायला. पण काहीपण म्हणा अलीकडे प्रेम ही भावना च खूप बदलत चालली आहे. माणूस प्रत्येक गोष्टींवर प्रेम करत असतो. ते दाखवून देत असतो. ते एक वय असत वेळ असते भावना असतात. पण अलीकडे खूप विचित्र परिस्थिती निर्माण होत असताना दिसून येत आहे. माणूस म्हणून जगताना आपण प्रेम या संकल्पनेकडे कस पाहतो तो पाहण्याचा दृष्टिकोन आपण बदलला पाहिजे.

लेखक-महेश बजरंग कोळेकर
रा.काक्रंबावाडी ता-तुळजापूर जि-धाराशिव.
संपर्क-9579228347/9146133047

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button