शहर
येळीव ता माळशिरस येथे कंटेनर व मोटरसायकलच्या झालेल्या भीषण अपघातात बंटी तनपुरे यांचा जागीच मृत्यू

टाईम्स 9 मराठी : प्रतिनिधी महेश मोहिते मो.8380848673
पुणे पंढरपूर रोडवरती असणाऱ्या काळा मारुती येळीव ता.माळशिरस येथे कंटेनर व मोटरसायकलचा भीषण अपघातामध्ये शिंदेवाडी गावचे फोटोग्राफर बंटी तनपुरे यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच कंटेनर ड्रायव्हर हा अजून पर्यंत कोमातच आहे असे असून पुढील तपास माळशिरस पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी करत आहेत.

NHI यांनी वेळीच लक्ष घालून पुरंदावडे येळीव वाडी नं२ येते बॅरिकेट बसवून घ्यावेत. व इथून पुढे होणाऱे अपघात टाळावे.मागील काही दिवसांमध्ये असे बरेच अपघात येथे झालेले आहेत. येथून पुढे असे अपघात होणार नाही याची काळजी घ्यावी अन्यथा स्थानिक नागरिक NHI विरोधात तीव्र स्वरुपात आंदोलन करणार असल्याचे सांगितले.



