महाराष्ट्र

महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ ऊस मळ्यातील पडिक जमीन भटके विमुक्त व दलितांना रहाण्यासाठी देण्याची मागणी

बी.टी.शिवशरण

महाराष्ट्रातील शेती महामंडळ ऊस मळ्यातील पडिक जमीन राज्यातील भटके विमुक्त व दलितांना रहाण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील या़चेकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात येणार असल्याची माहिती आरपीआयचे वतीने ज्येष्ठ नेते तुकाराम बाबर शामराव भोसले बी टी शिवशरण बापूसाहेब पोळके गणेश सावंत विश्वजीत भालशंकर संजय खरे रमेश भोसले यांचे वतीने करणार असल्याची माहिती ज्येष्ठ नेते तुकाराम बाबर व शामराव भोसले यांनी दिली आहे राज्यात शेती महामंडळ ऊस मळ्यातील सुमारे दहा हजार हुन अधिक एकर पडीक जमीन शिल्लक आहे

सध्या शेती महामंडळ उत्पादन लागवड बंद आहे तसेच खंडकरी यांना जमीनीचे वाटप केलेले आहे श्रीपूर ऊस मळ्यातील जमीन खाजगी कंपनीला संयुक्तरीत्या करार पद्धतीने कसायला दिली आहे उर्वरित शेकडो एकर जमीन गेली अनेक वर्षे पडीक आहे ती पडीक जमीन गोरगरीब जनता भटके विमुक्त दलित समाजातील नागरिकांना रहाण्यासाठी द्यावी अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे करण्यात येणार आहे अनेक गोरगरिबांना घरकुल व इतर योजनेतून घर बांधायला मंजुरी येते मात्र स्वतःच्या मालकीची हक्काची जागा नसल्याने घरकुल शासनाकडे परत जातात ही अडचण व समस्या लक्षात घेऊन शासनाने शेती महामंडळ ऊस मळ्यातील पडिक जमीन वर नमूद केलेल्या व्यक्तींना देऊन सहकार्य करावे अशी मागणी आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button