संपादकीय

चळवळ नशा की मेंदू बधीर करणारी गोष्ट?

ऍड अविनाश टी काले , अकलूज , तालुका माळशिरस , जिल्हा सोलापूर
मो न 9960178213

भटक्या विमुक्त जमाती पैकी वडार या जात वर्गातून वाटेगाव जिल्हा सांगली या क्रांतिकारी भूमीतून जन्माला आलेलं सर्जन वादी , आंबेडकर वादी नेतृत्व म्हणजे आपल्या सर्वांचे तुकाराम जी माने साहेब ,
सातत्याने चिंतन आणि मनन करण्याचा त्यांचा स्वभाव आणि चळवळीवर नितांत असलेली अभेद्य अशी निष्ठा याने सातत्याने अस्वस्थ असलेल हे नेतृत्व ,,,
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागात अभियंता पदावर काम करून खोऱ्याने पैसा मिळत असताना ही , डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुस्तकाच्या संपर्कात आले , गांधी आणि काँग्रेस ने अस्पृश्यांसाठी काय केले?हे वाचून वाचून त्यांच्या मेंदूच्या ठिकऱ्या उडाल्या , संयुक्त मतदार संघाने मागास जाती आणि आदिवासी समाजाच्या हातात राजकीय आरक्षणाच्या नावाखाली फक्त दलाल दिले , जे त्यांच्या हिताचे कांहीच करत नाहीत ,

आरक्षित वर्गाच्या अनेक सार्वजनिक हिताला बाधा पोहचवली जात असताना , त्यांचा अनुशेष भरला जात नसताना , आणि मागास वर्गाच्या अभ्युद्यासाठी योग्य तो निधी ही वापरला जात नसताना , खाजगीकरण वेगाने वाढवून सार्वजनिक सेवा चे आकुंचन करून नौकर भरती प्रक्रिया स्थगित केली जात असताना , व अश्या प्रकारचे अनेक कायदे विधिमंडळ व लोकसभेत पारित होत असताना ही दाताची दातखीळ बसवून प्रस्थापित पक्ष गप्प बसलेले असताना आपण शांत आणि मुक राहून चालणार नाही अस म्हणून स्वेच्छा राजीनामा देऊन बाहेर पडून चळवळ करणाऱ्या या नेतृत्वाला हा प्रश्न पडला आहे की चळवळ मेंदूला चालना देणारी की मेंदू बधीर करणारी गोष्ट आहे हेच कळत नाही

कांहीं काळ चळवळ करून नंतर प्रस्थापितांशी जुळवून घेऊन आर्थिक सुबत्ता , सामाजिक दर्जातील स्वतः चे उंचावून घेणे अश्या दलाली करून शासकीय पुरस्कार मिळवून प्रतिष्ठित होणारा वर्ग आणि त्या प्रकारचे नेते हे चळवळीतील दलाल आहेत , व त्यांनी त्यांच्या निष्ठा गहाण टाकलेल्या आहेत , ही बाब स्पष्ट आहे , त्यांचे दृष्टिकोनातून चळवळ ही संधी आहे ,ती नशा ही आणत नाही आणि स्वतः ला उध्वस्त ही करून घेत नाही , पण अनेकांच्या जीवनात आणि संसारात राख कालवून स्वतः ची पोळी मात्र तुपात तळून पुढच्या 70पिढ्यांची खाण्याची सोय मात्र करून जातात चळवळ नशा आहे का? ती मेंदू बधीर करते का? चळवळ ना नशा आहे , ना ती मेंदू बधीर करते , पण ती व्यापक समाज हितासाठी स्व स्वार्थाचा त्याग करायला शिकवते , तत्वासाठी अगदी जीवनाचा त्याग करावा लागला तरी ती मागे हटत नाही ,
जगाच्या पाठीवर अनेक क्रांतिकारक या चळवळीने निर्माण केले त्यांनी केलेल्या त्यागातून जग बदलले ,

जागतिक पातळीवर अगदी भगवान गौतम बुद्ध आणि महावीर यांची उदाहरणे आहेत ज्यांनी राज वैभवाचा त्याग करून तपस्वी होऊन मानवी दुख निवारण्याचा प्रयत्न केला . क्युबन राष्ट्रात साम्यवादी क्रांती घडवून आणताना फिडेल केस्टो चे नेतृत्वाखाली काम करणारे कॉम्रेड अर्नेस्टो चे गुएवरा यांचे उदाहरण देता येईल , किरकोळ शरीरयष्टी , दम्याचे रोगी असताना ही आणि क्युबा ने नागरिकत्व देवून मंत्री बनवलेले असताना , एखादा सुख भोगत बसला असता पण हा माणूस लॅटिन अमेरिकेत क्रांती करण्यास गेला आणि अमेरिकन सरकारने त्यांना पकडून फासावर चढवले ,,,
महाराष्ट्रात आणि देशात , सरदारकी , मांडलिक राजेपद , आणि मनसबदारी मिरवणारे हजारो होते , पण बालवयात रायरेश्वरापुढे शपथ घेऊन स्वराज्य निर्मितीचा ध्यास घेऊन तो सफल करणारे राजे फक्त छत्रपती शिवराय होते ,

भूक तहान याची पर्वा न करता जंगलात राहून नाउमेद न होता सैन्य बांधणी करून मुघल सत्तेला हळदी घाटात आव्हान देणारे महाराणा प्रताप सिंह च फक्त होते ,
जयसिंग , मानसिंग यांच्या पूजा कोणी बांधल्या नाहीत , पण छत्रपती शिवाजी महाराज , महाराणा प्रतापसिंह , छत्रपती संभाजी राजे यांना हा देश विसरला नाही
सगळेच गुलामी भोगत असताना , शाररिक आणि मानसिक गुलाम झालेले असताना , पुण्या सारख्या सनातनी बाले किल्ल्यात , 200 वर्षा पूर्वी महात्मा जोतिबा फुले सारखा सामाजिक क्रांतिकारक जन्माला येतो , आकार घेतो आणि युद्ध ही तडीस नेतो ,
त्यांचाच आदर्श घेऊन व्यक्तिगत सुख आणि समृध्दी ला लाथ मारून समग्र हयात भर एकच ध्यास अस्पृश्याचा, आदिवासी , भरक्या विमुक्त , ओबीसी , अल्पसंख्याक यांच्या मुक्ती चां त्यांना संरक्षित करण्याचा ध्यास घेऊन जगलेले डॉ बाबासाहेब आंबेडकर , या सर्व महापुरुषांचा त्याग काय कमी आहे?

त्यांना ही नशा नव्हती , धुंदी नव्हती , नशा आणि धुंदी कायमस्वरूपी कधीच नसते , तिचा कालावधी मर्यादित असतो समग्र शुद्ध ठेऊन आणि जाणते पणाने घेतलेलं हे व्रत होत व आहे याच प्रेरणा घेऊन माणस चळवळीत निर्माण होतात , ती या प्रवाहात येतात , कांहीं जण कांहीं काळ प्रवाहात राहतात आणि लोभाचा एक भोवरा येतो आणि त्यात ते गटांगळ्या खाऊन तळाला जातात
कांहीं जण जाणिवे शिवाय वाहत राहतात , अगदी निर्बुद्ध बनून , प्रवाह त्यांना ढकलत राहतो , कधी तरी ते ही किनाऱ्यावर येऊन निपचित पडून राहतात
म्हणून चळवळीत अश्याच माणसांची गरज असते जी व्यक्ती निष्ठ , पक्ष निष्ठ राहण्या पेक्षा वैचारिक निष्ठा जपणारे असतील माने साहेब ही माणस चळवळीला ही शोधता आली पाहिजेत , त्यांनीच एकमेकाचे आधार बनले पाहिजे , तर चळवळी जिवंत राहतील ,
उपरा कार लक्ष्मण राव माने साहेब यांचे “किटाळ” नावाचे पुस्तक नव्याने आलेले आहे , ज्यात त्यांचे विरोधात लैंगिक शोषणाचे आरोप झाले होते , त्यांना उच्च न्यायालयातून मुक्तता मिळाल्या नंतर आणि राज्य शासनाने सुप्रीम कोर्टात अपील न केल्या नंतर (मुदत टळून गेल्या नंतर )हे पुस्तक आत्मचरित्र म्हणून बाहेर आलेले आहे ,

यातील अनेक पदर आम्ही ही जाणतो , रासपा संस्थापक महादेव जी जानकर साहेब यांनी केलेली फडणवीस यांच्याकडील मध्यस्थी ही आम्हाला ज्ञात आहे
पण मुळात ही फट का मिळाली? हा प्रश्न ही राहतोच ,,, समग्र स्त्री वर्गाला आई समान आणि बहिणी समान मानून चालण्याची शिकवण चळवळीत आली तरच नैतिक पायावर ही चळवळी टिकतात हा माझा अनुभव अनेकांच्या बाबतीत आहे राजकारणात ते पवार साहेब यांचेशी बांधिलकी मानतात , आणि याचे कारण देताना ते उदार मत वादी आहेत हे सांगितले जाते मागासवर्गीय , आदिवासी , अल्पसंख्याक , ओबीसी हे अश्या व्यक्तीच्या उदार मत वादाच्या आधारे कायम स्वरुपी सुरक्षित राहू शकतात काय? याचे ही उत्तर मिळाले पाहिजे , दिवंगत आर आर आबा पाटील हे सुसंस्कृत राजकारणी म्हणून ओळखले जातात , ते गृहमंत्री असताना ज्या गावाने दलीत कुटुंब बलात्कार करून जाळून मारले त्या गावाला महात्मा गांधी तंटामुक्त पुरस्कार दिला , हे वास्तव आहे
आज ज्या शिवसेनेला पुरोगामी म्हणून डोक्यावर घेतले जात आहे त्याच शिवसेना पक्षाने रमाबाई आंबेडकर नगर मध्ये गोळीबार करून आंबेडकरी समुदाय जिवे मारला होता ,

रिडल्स वेळी हुतात्मा चौक बाटला म्हणून गो मुत्राने साफ करणारे छगनराव भुजबळ होते हे कसे विसरून चालेल?
केंद्रीय सत्तेचा वरवंटा फिरला म्हणून आज शिवसेना कडे सहानुभूती आहे , पण ते तरी काय करू शकत होते? ते हतबल होते ,ही हतबलता स्वतः चे वाट्याला येऊ नये म्हणून राष्ट्र वादी काँग्रेस पक्ष नागालँड मध्ये गरज नसताना भाजप समवेत गेला , आणि याचे समर्थन करताना राज्याच्या हिताचा विचार करून या शब्दाची पेरणी केली जाते म्हणून साहेब सॉफ्ट हिंदुत्व आणि सनातनी हिंदुत्व असा फरक नसतो ही बाब लक्षात ठेवा ,
धार्मिक युद्ध ही आज चळवळीची गरज नाही , धार्मिक युद्ध छेडणे म्हणजे बहुसंख्य जनतेला हिंदुत्वाच्या छावणीत ढकलणे आहे ही बाब लक्षात घ्या ,
या ऐवजी चळवळी नी जनतेच्या मूलभूत प्रश्नाची , त्यांच्या समस्यांशी जनतेला अवगत करावं अस मला वाटत ,

आपली स्व शक्ती हीच खरी शक्ती असते , बाकीच्या शक्ती ह्या भ्रामक आहेत , आपली लढाई दुसऱ्याच्या भरवशावर लढता येत नाही आणि जिंकता ही येत नाही या अर्थाने ऍड प्रकाश जी आंबेडकर यांचा वंचित चां प्रयोग हा स्व शक्ती जागरण आणि उभारणी चां प्रयोग आहे , ज्यातून आपण प्रस्थापितांना धक्के देऊ शकतो ,,,
तुम्ही घेतलेला निर्णय अचूक आहे , ही बाब भविष्य काळ ही मान्य करेल इतकेच.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button