कवी उत्तम बबन गळवे यांना कलाश्री राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

उपसंपादक—–हुसेन मुलाणी
टाइम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
मो. 9730 867 448
इंगळी, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. येथे रविवार दि 5 मार्च 2023 रोजी कवी सरकार स्वाभिमानी वाचनालय इंगळी, आयोजित 13 वे राज्यस्तरी मराठी ग्रामीण साहित्य संमेलनात लक्ष्मीनगर, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर येथील कवी -उत्तम बबन गळवे यांना स्व. लक्ष्मी सुरेश कुराडे प्रेरणादायी कलाश्री पुरस्कार देऊन गौरविण्यात आले . तसेच सन्मान चिन्ह, शाल ,श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप होते. हा पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर श्रीकांत पाटील व साहित्यिक विचारवंत डॉक्टर सुरेश कुराडे यांच्या हस्ते सन्मान झाला.
कवी – उत्तम बबन गळवे यांचा 50 पेक्षा जास्त स्पर्धेत सहभाग. यापूर्वी 2020 चा महाकवी वामनदादा कर्डक जीवन गौरव पुरस्कार, 2022 चा संत रोहिदास पुरस्कार, 2022 चा उत्कृष्ट कलाकार पुरस्कार ,असे अनेक जिल्हास्तरीय ,राज्यस्तरीय, पुरस्काराने विविध मान्यवराच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे.
त्यांना हा पुरस्कार जाहीर झाल्यामुळे त्यांचे सांगोला तालुक्यातील लक्ष्मीनगर गावाकडून सामाजिक, राजकीय, साहित्यिक, क्षेत्रातून अभिनंदन केले जाते आहे.



