शहर

महिलांनी कुटुंबाबरोबरच स्वतःच्याही आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे-प्राध्यापक – मीनाक्षी अमोल जगदाळे

उपसंपादक ———हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो . 97 30 867 448

8 मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मराठा सेवा संघ ,संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेड च्या वतीने व उपजिल्हा रुग्णालय अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी आरोग्य विषयक मार्गदर्शन व मोफत सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा कार्याध्यक्ष शिवमती प्रा. मीनाक्षी अमोल जगदाळे यांनी सोलापूर विभाग पंढरपूर यांच्यामार्फत करण्यात आले होते.

प्रांरंभी जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून वैद्यकीय अधीक्षक महेशा गुडे , वैद्यकीय अधिकारी, डाॕ. सुप्रिया मदने ,डॉ. रेश्मा देशमुख सरताळे आयुष अधिकारी, डॉ. श्रद्धा नरवणे दंतचिकित्सक माळशिरस तालुका आरोग्य अधिकारी व अध्यक्ष माळशिरस तालुका मराठा सेवा संघ रामचंद्र मोहिते व माळशिरस तालुका संभाजी ब्रिगेड अध्यक्ष दिगंबर मिसाळ उपाध्यक्ष सचिन पराडे शिवाजी जगदाळे आदी मान्यवर उपस्थित होते.


याप्रसंगी आरोग्य विभागातील सर्वांचा तसेच सर्व परिचारिकांचा महापुरुषांची ऐतिहासिक पुस्तके देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.याप्रसंगी डॉ महेश गुडे यांनी कालची स्त्री व आजची स्त्री, योग्य व चुकीची आहार पद्धती, परिवर्तन हा काळाचा नियम याबद्दल मार्गदर्शन केले . डॉ. रेश्मा देशमुख सरताळे यांनी वेगवेगळ्या प्रकारची जीवनसत्वे आहाराचे नियोजन ,आयुर्वेद पद्धती व त्याचे फायदे ,मोफत सरकारी सुविधा व स्कीम याबद्दल मार्गदर्शन केले.

तसेच दिगंबर मिसाळ यांनी ग्रामीण महिला व शहरी महिला यातील तफावत, रक्तदानाचे महत्त्व ,स्त्री ही कुटुंबाचे केंद्रस्थान व प्रत्येक गोष्टीची सुरुवात घरच्या स्त्री पासून याबद्दल मार्गदर्शन केले. प्रा. मीनाक्षी अमोल जगदाळे यांनी भारतीय कुटुंब व्यवस्था व स्त्री, स्त्रीभ्रूणहत्या, महिलांना आर्थिक ,सामाजिक ,शैक्षणिक दृष्ट्या बरोबरीचे स्थान , कुटुंबामध्ये बरोबरीचे स्थान तसेच वेगवेगळ्या मोफत सरकारी योजना याविषयी मार्गदर्शन केले.


यावेळी महिलांसाठी सर्व रोग निदान चाचण्यांचे नियोजन करण्यात आले होते. महिलांमधील रक्तदाब, रक्तगट ,हिमोग्लोबिन ,ईसीजी ,रक्त शर्करा ,थायरॉईड यांचीही तपासणी करण्यात आली. यावेळी शेकडो महिलांची या शिबिरामध्ये तपासणी करण्यात आली.


या कार्यक्रमासाठी वनिता कोरटकर, .स्वाती जगताप , गवसने, उज्वला अडाणे , .सायली लोखंडे, एकतपुरे , देशमुख, केंजळे, पाटील , जगदाळे , गोडसे, भाकरे तसेच – सुनिता भालेराव आधीपरिचारिका, . माधुरी पाखरे औषध निर्माता, वैशाली पांडव लॅब टेक्निशियन ,सिस्टर – केंजळे, पठाण, राठोड, शिंगाडे ,मोरे , जाधव , कीर्तके, तसेच जिजाऊ ब्रिगेड पदाधिकारी सदस्य व असंख्य महिला उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन वनिता कोरटकर यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button