महाराष्ट्र

डॉ बाबासाहेब आंबेडकर जीवंतपणी लढले,मृत्यू नंतर ही आमच्या हक्काच्या स्वरंक्षण साठी पोलादी भिंत बनून राहिले

ऍड अविनाश टी काले अकलूज,तालुका माळशिरस
जिल्हा सोलापूर मो न :- 9960178213

मराठा , जाट , गुर्जर , धनगर , अश्या अनेक समाजाची आंदोलने आज देश भरात चालू असतात , कांहीं ना ओबीसी समाजात आरक्षण हवे , तर कांहीं ना एस टी चे आरक्षण हवे , याही पुढे जाऊन एस सी तील कांहीं जाती ना स्व जाती साठी तुटक असे स्वंतत्र आरक्षण हवे
या लढाया चालू होऊन अनेक वर्ष लोटली , पण हे आरक्षण त्यांना सहजी का मिळत नाही?ते संख्येने बहुसंख्य आहेत , राजकारणात दबंग आहेत , सामाजिक प्रतिष्ठा त्यांच्या पायाची दासी आहे ,

एस टी,वर्गातील पारधी अज्ञानी आहे,त्याला समाज ही मारतो,पोलीस ही मारतात,या विरोधात त्यांच्या बायका आक्रोश शिव्या शाप देतात त्या फक्त तेवढेच करू शकतात , पण त्यांच्यातील ही एखादा पोलीस अधिकारी निर्माण होतो,आमदार पत्नी ने पारधी समाजाच्या माय ला उघडे नागडे केले तरी त्या आमदार पत्नी वर केस होते , ही ताकद कायद्याची आहे हाताशी अर्थ कारण नाही , सामाजिक प्रतिष्ठा नाही , जमीन जुमला नाही , माडी हवेली , गाड्या आणि महागड्या कार फक्त चित्रपटात पाहिलेला हा समाज त्यांचे शैक्षणिक , नौकरी , आणि राजकीय आरक्षण निर्माण झाले ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनात्मक रित्या दिले व संरक्षित केले म्हणून आज ही टिकून आहे

राज्याला आणि विशेष कायदा करून कोणती जात आर्थिक सामाजिक मागास आहे हे ठरवण्याचा अधिकार दिला गेला यातून ओबीसी आरक्षण निर्माण झाले
मागास वर्गीय आयोग नेमून त्याने केलेल्या सर्व्हे चे आधारे हे आरक्षण देण्याचे अधिकार राज्याला आले ,
आणि ओबीसी मध्ये राजकीय मताची टक्केवारी वाढावी म्हणून प्रतिष्ठित जातींचा समावेश ओबीसी त करण्यात आला , आणि तेथून ही लाट उसळली की ते इतर मागास आहेत तर आम्ही का नाही?याच ओबीसी आरक्षणाचे विरोधात के कृष्ण मूर्ती यांनी याचिका दाखल केली , उत्तर प्रदेशात ओबीसी आरक्षण 33%तर कर्नाटक , महाराष्ट्र इथे 27% आरक्षण ,,,हे आरक्षण राज्यांना देण्याचा अधिकार आहे काय? याचे उत्तर सुप्रीम कोर्टाने दिले आणि होय असा अधिकार राज्यांना आहे , पण तो त्यांना मनमानी प्रमाणे वापरता येणार नाही ,राज्याने मागासवर्ग आयोग निर्माण करून ज्या समाजाला ते आरक्षण देऊ इच्छितात त्यांचा इम्पिरिकल डाटा गोळा करणे आवश्यक आहे ,

“इम्पीरिकल ” याचा अर्थ वस्तुनिष्ठ ,,,वास्तवावर आधारलेला (कल्पना आणि युक्तीवाद) यावर नव्हे
हा डाटा तीन पातळ्यांवर हवा असतो ज्यास “ट्रीपल टेस्ट ” म्हणून आपण ओळखतो

1,,,, सामाजिक दर्जा
2 ,,,,आर्थिक मागासलेपण
3,,,,,प्रशासन आणि राजकीय सत्तेतील त्यांच्या भागीदारी चां टक्का

या तिन्ही पातळीवर तो मागास असेल तरच आयोगाची शिफारस कोर्ट मान्य करते एस सी , आणि एस टी आरक्षण हे त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात असते , त्या नुसार स्थानिक स्वराज संस्थेत जागा आरक्षित होतात
विकास गवळी यांनी याच ओबीसी आरक्षणाला आव्हान दिले आणि विदर्भातील अकोला , वासिम , चंद्रपूर , नागपूर व हिंगोली या 5 जिल्ह्यात आदिवासी बहुल आहेत , इथे सर सकट ओबीसी ना 27%आरक्षण दिल्याने ही मर्यादा 50%ची मर्यादा ओलांडून जाते , जी सुप्रीम कोर्टाने इंद्रा सहानी केस चे निकाला प्रमाणे घालून दिली आहे

तेंव्हा कोर्टाने या इम्पीरिकल डाटा शिवाय आरक्षण देण्यास बंदी घातली हे सर्व आठवण्याचे कारण इतकेच आहे की राजकीय दृष्ट्या दबंग असलेला , बहुसंख्यांक असलेला , व आर्थिक दृष्ट्या मजबूत असलेल्या जाती वर्गाने एस सी , एस टी चे आरक्षण लीलया नामशेष करून टाकले असते ,मी समाज माध्यमावर पाहताना अनेक अल्पसंख्यांक , ओबीसी , भटके विमुक्त , आणि मुस्लिम समुदाय आणि एस सी वर्गातील लोक ही मराठा समाजाला ओबीसी त घ्या म्हणून मागणी साठी त्यांचे समवेत दिसून येतात ,

याचे कारण त्यांचे काय हिरावून घेतले जाणार आहे हेच त्यांना ठाऊक नाही मला बायबल मधील स्वतः चे मरणाचा कृस स्वतः चे खांद्यावर ओढून नेणारा प्रभू येशू या लोकांत दिसतो ,इतके ते या बाबतीत अज्ञानी आहेत
पण डॉ बाबासाहेब आंबेडकर दीर्घ दृष्टी ठेवत होते , माझ्या माघारी काय? उच्च वर्णीय समाजाच्या , नेत्यांच्या शाब्दिक कोट्या आणि मखमली झुली आड त्यांनी स्वतः ला वाहवू दिले नाही ,शाब्दिक आश्वासने आणि महात्म्यांच्या बोलीवर समाजाचे हित उधळून दिले नाही , तर त्या हक्का ची , आरक्षण तरतुदीची कायदेशीर घटनात्मक तरतूद करून ठेवली आहे म्हणून आपला किमान बचाव आज स्वातंत्र्या चे 75वर्षानंतर ही होत आहे

बहुजन जागा राहिला नाही तर मात्र काय होईल ते सांगता येणार नाही , ते ना राज्य घटना ठेवतील ना घटनात्मक आरक्षण याचीच भीती वाटते ,आजचे समाजातील राजकीय दलाल , भाट पाहिले की , या पोलादी भिंत बनून राहिलेल्या आमच्या बापा कडे पाहिल्या नंतर त्यांच्या समोर फक्त लिन होतो , नतमस्तक होतो आणि आपसूक तोंडातून शब्द बाहेर पडतात जयभीम..

आपला धम्म बंधू
ऍड अविनाश टी काले
अकलूज , तालुका माळशिरस
जिल्हा सोलापूर
मो न :- 9960178213

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button