माळशिरस विधानसभेची पोट निवडणुकी संदर्भात सुरु असलेल्या वक्तव्याची साजीद सय्यद यांनी उडविली खिल्ली…

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
माळशिरस तालुक्याचे माजी आमदार राम सातपुते यांच्या संपर्कात असलेल्या काहीं कार्यकर्त्या कडून माळशिरस तालुक्यात पुन्हा एकदा विधान सभा निवडणुकीची पोट निवडणुक होणार असल्याच्या वावड्या उठत असताना टाइम्स 9 न्यूज ने आमदार उत्तमराव जानकर यांचे अकलूज येथील कट्टर समर्थक साजीद सय्यद यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले की,सध्याच्या घडीला माजी आमदार राम सातपुते यांच्या कडे असले निरर्थक चर्चा करण्या पलीकडे काहीं काम नसून ते आपल्या जवळच्याच लोकां जवळ असले वक्तव्य करून त्यांना दिलासा देण्याचे काम करीत असल्याचे ते म्हणाले…
पुढे बोलताना ते असे हि म्हणाले की,माळशिरस तालुक्यात सध्या तरी राजकीय वातावरण अलबेल असुन जनता फक्त महाराष्ट्र सरकारच्या निधी ची वाट पाहत आहे,कारण खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि आमदार उत्तमराव जानकर यांनी योजलेली अनेक विकास कामे फक्त अन् फक्त निधी अभावी रखडून पडल्याचे हि ते म्हणाले…

राम सातपुते यांच्या संपर्कात असलेल्या कार्यकर्त्यांनी ज्या वावड्या उठविल्या आहेत त्या पेल्यातील वादळच ठरणार असल्याची माहिती साजीद सय्यद यांनी दिली,माजी आमदार राम सातपुते यांना विकासच करायचा होता तर त्यांनी माळशिरस तालुक्यात एमआयडीसी (MIDC) ची योजना आखायची होती…? असा प्रश्न देखील साजीद सय्यद यांनी या वेळी उपस्थित केला…
जानकर आणि मोहिते पाटील गटाला उद्धट पणे विरोध करणाऱ्या काहीं कार्यकर्त्या साठी माजी आमदार राम सातपुते हे असे वक्तव्य करून त्यांना रिजवत ठेवायचे पाप सध्याच्या घडीला ते करत असुन या मुळे माळशिरस तालुक्यातील जनतेची ते एक प्रकारे करमणुकच करत असल्याचे सांगत त्यांच्या वक्तव्याची खिल्ली उडविली…