स्त्री केवळ शक्ति नाही तर ती जगत जननी— प्रा मीनाक्षी अमोल जगदाळे

आमीर मोहोळकर
प्रतिनिधी,टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499
विजयसिंह मोहिते पाटील विद्यालय वाघोली मध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला,यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या पुणे विभागीय अध्यक्ष प्रा मीनाक्षी अमोल जगदाळे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या…
त्यांनी विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच महिला पालक यांच्याशी महिला दिनाच्या निमित्ताने संवाद साधला सर्वप्रथम राजमाता जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या महानायिकांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून व अभिवादन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली…

प्राध्यापक मीनाक्षी जगदाळे यांनी महिलांना जागृत करून चूल व मूल सांभाळून स्त्री कशी सक्षम होत आहे हे सांगून महिलांमध्ये नवचैतन्य निर्माण केले,महिलांना संकटावर मात करून पुढील वाटचाल आनंदाने अशी करावी याची मार्गदर्शन केले,त्याचबरोबर जिजाऊ आऊसाहेब क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अहिल्याबाई होळकर रमाई आंबेडकर अशा महानायिकांच्या जीवनाची व कार्याची माहिती सांगितली.
प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी समाज उभारणीसाठी जे योगदान दिले त्याबद्दल माहिती दिली त्याचबरोबर स्त्री शिक्षणाचे महत्त्व यावर देखील माहिती दिली…

यावेळी महिलांच्या वेगवेगळ्या स्पर्धा घेण्यात आल्या तसेच मनोरंजनात्मक कार्यक्रम व संगीत खुर्ची घेण्यात आली व महिलांना बक्षीस देण्यात आले,यावेळी महिलांनी वेगवेगळ्या वेशभूषा केल्या होत्या .कार्यक्रम अतिशय मनोरंजक व हर्षमय साजरा झाला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेतील मुलींनी केले तसेच प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक माननीय कर्चे सर यांनी केले व आभार प्रदर्शन श्री चव्हाण सर यांनी मानले…