महाराष्ट्र

महाराष्ट्र केसरी सोलापूर जिल्हा निवड चाचणी स्पर्धेत खुल्या गटातुन मंगळवेढ्याचा महेंद्र गायकवाड (माती) तर माळशिरसचा शुभम माने(मॅट) गटातून यांची निवड

प्रतिनिधी…. रियाज मुलाणी
मो.9921500780

अकलूज – सोलापूर जिल्हा तालीम संघ व महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटने च्यावतीने आयोजित महाराष्ट्र केसरी सोलापूर जिल्हा निवड चाचणी स्पर्धेत खुल्या गटात मंगळवेढ्या चा महेंद्र गायकवाड(माती)तर माळशिरसचा शुभम माने(मॅट)या विजेता मल्लांची महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी निवड झाली. 

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परीषदेव्या मान्यतेने कर्जत येथे २६ मार्च ते ३० मार्च २०२५ कालावधीत होणाऱ्या ६६ व्या वरिष्ठ राज्य अर्जिक्यपद महाराष्ट्र केसरी कुस्ती लढत स्पर्धा २०२४- २५ साठी सोलापूर जिल्हा तालीम संघ आयोजित व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदे चे उपाध्यक्ष डॉ.धवलसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटने च्या नियोजनाखाली अकलूज येथील धवल श्रीराम मंदिर,धनश्री नगरात १५ व १६ मार्च २०२५ दरम्यान सोलापूर जिल्हा निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या निवड चाचणी स्पर्धेचा शुभारंभ सोलापूर तालीम संघाचे अध्यक्ष डॉ.धवलसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी तालीम संघाचे उपाध्यक्ष सर्जेराव चवरे,रावसाहेब (छोटा) मगर,मारुती वाकडे, महादेव भंडारे,महादेव ठवरे,प्रताप झंजे, वामन उबाळे,भारत मेकाले, विलास कंडरे,अभिमन्यू डमरे, भारत भोसले,केदार साखरे, नरसिंह कुलकर्णी,सचिन भोपळे, ज्ञानदेव पालवे,अण्णासाहेब शिंदे सुदर्शन मिसाळ,आण्णासाहेब इनामदार,सुदर्शन मिसाळ, नवनाथ साठे,नारायण माने,मयुर माने,संग्राम भोसले,नेताजी काळकुटे शहाजी आगाडे उपस्थित होते.
या निवड चाचणी स्पर्धेतील खुल्या गटात अंतिम लढत (माती)विभागात महेंद्र गायकवाड(मंगळवेढा)विरुद्ध आदित्य कोकाटे (माळशिरस) यांच्यात झाली.

या कुस्तीत महेंद्र गायकवाड तर मॅट विभागात अंतिम कुस्ती शुभम माने माळशिरस विरुध्द आदित्य गवसणे अकलूज यांच्यात होवुन शुभम माने महाराष्ट्र केसरी मॅट स्पर्धेसाठी निवड झाली आहे.विजेत्यांना माजी आ.रामभाऊ सातपुते,डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील,डॉ.धवलसिंह मोहिते पाटील महाराष्ट्र केसरी छोटा रावसाहेब मगर, प्रा.रामभाऊ झोळ, भाऊसाहेब आंधळकर, श्रीकांत देशमुख, मच्छिंद्रभाऊ ठवरे,शरदबापू मोरे,प्रदिप जगदाळे, शशांक पवार, सुधीर लांडे, भिमराव बाळगी,यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

स्पर्धेतील वजन गटात मॅट ५७ किलो वैभव यळगुंडे (सोलापूर), ६१ किलो करण माने(पंढरपूर), ६५ किलो ज्योतिबा अटकळे (पंढरपूर),७० किलो किरण संत्रे (पंढरपूर),७४ किलो विकास करे (माळशिरस),७९ किलो शुभम मगर(माळशिरस),८६ किलो रोहित निटवे(माळशिरस),९२ किलो शिवराज डोंबाळे (माळशिरस),९७ किलो शंकर बंडगर(माढा), वजन गटातील माती ५७ किलो विशाल सुरवसे (माढा),६१ किलो अजय भुसनर (माळशिरस),६५ किलो अनिकेत मगर(माळशिरस), ७० किलो ऋषीकेश पवार(पंढरपूर),७४ किलो तुषार झंजे (माळशिरस), ७९ किलो प्रणव हांडे (माळशिरस),८६ किलो बिरुदेव बनसोडे(मोहोळ),९२ किलो अर्जुन काळे(करमाळा),९७ किलो श्रीनिवास पाथरुठ (मोहोळ)यांची निवड झाली.

    यावेळी मल्लसम्राट रावसाहेब आप्पा मगर पंचायत समिती सदस्य गौतम माने, ज्ञानदेव लोखंडे,महादेव ठवरे  सर्जेराव चवरे नामदेव नाना वाघमारे,भारत मेकाले, हिम्मत सोलंकर  अॅड.सोमनाथ अण्णा वाघमोडे, विजय जवळकर भानुदास सालगुडे पाटील,आप्पा टिळे सर्जेराव घोडके अण्णा कदम,आप्पासाहेब वाघमोडे  आण्णासाहेब गायकवाड  झुंजार सोलंकर दादा पाटील प्रवीण मगर सोमनाथ भोसले आप्पा मगर प्रताप झंजे मिलिंद सरतापे,दादा पाटील, अभिषेक कांबळे ,मारुती पाटील, गोरख पवार, दत्तात्रय मगर, दत्ता मगर सागर मोटे सतीश नाना पालकर अण्णासाहेब शिंदे सुदर्शन मिसाळ नवनाथ साठे सुधीर रास्ते मयूर माने,राजाभाऊ  गुळवे,सचिन पाटील,पिंटू वैद्य,  दादा नामदास विकास शिंदे संग्राम भोसले,जयसिंग मोरे,बापू मगर,बाळासाहेब कोकाटे, विवेक गवळी,बापू कोकाटे,शहाजी आघाडे, विठ्ठल इंगळे, राहुल जाधव, प्राचार्य रज्जाक शेख, यांचे सह सोलापूर जिल्हा तालीम संघ  व महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटना सर्व पदाधिकारी उपस्थित होते. स्पर्धेसाठी पंचाचे काम रवी बोत्रे,बाळू मेटकरी,अक्षय टिळेकर,धनराज भुजबळ,बापू लोखंडे,राजेंद्र 

कणसे,सचिन ऐवळे,प्रकाश घोरपडे,गणेश मगदूम यांनी केले तर निवेदन युवराज केचे व हणमंत शेंडगे यांनी केले.या कार्यक्रमाचे नियोजन ज्ञानदेव पालवे,नारायण माने यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
05:34