महाराष्ट्र

मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या सभा म्हणजे भविष्य सांगणाऱ्या पिंजऱ्यातील पोपटासारखी

बी टी शिवशरण


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या जाहीर सभा व त्यांची भाषणे पहिली तर ते जे बोलतात व पुन्हा गायब होतात म्हणजे भविष्य संगणारा एक वर्ग आहे त्यांच्याकडे एक लहान पिंजरा असतो त्यात त्याने एक पोपट बंदिस्त केलेला असतो त्या पोपटाकडून तो जोतिषी भविष्य पहायला आलेल्या चे कार्ड काढून देतो कार्ड काढून दिले कीं तो पोपट पुन्हा त्या पिंजऱ्यात जाऊन बसतो पिंजऱ्याची कडी लावली जाते ज्या देवाचा फोटो त्या पोपटाने आपल्या चोचित काढून बाहेर ठेवतो त्यावर तो भविष्य सांगणारा विष्लेशन करुन त्याचे भविष्य कथन करुन पैसे कमावतो तशी अवस्था राज ठाकरे यांच्या जाहीर सभा बाबत म्हणता येईल झोपी गेलेला जागा झाला या प्रमाणे महिन्यातून एकदा चार महिन्यातून एकदा सभेच्या जागा ठरवून ते सभा घेत असतात तेच डायलॉग तीच नक्कल तेच मुद्दे या पलीकडे काही नसते मनसे चे कार्यकर्ते लोक नेहमीप्रमाणे सभा ऐकायला गर्दी करायला भाडोत्री व्यवहार जसे असतातत्या प्रमाणे ठरवून जुळवून ओढून ताणून प्रदर्शन केले जाते वर उल्लेख केलेल्या प्रमाणे भविष्य सांगणारा जसा कार्ड काढण्यासाठी पोपट पिंजऱ्यात पाळतो तसे मनसे हा पक्ष् केवळ नक्कल डायलॉग अनुकरण पोपटपंची व विरोधाला विरोध आरोपांना टिकेतुन मिमिक्री करुन उत्तर देण्यासाठी राज ठाकरे पोपटाप्रमाणे काम करतात असे म्हटले तर वावगे काय दुसरे असे कीं त्यांच्या सभेतून महाराष्ट्र हित भविष्य उपाय परिणाम काय पहायला मिळतात जसे म्हटले जाते कीं हा महाराष्ट्र कीर्तनातून सुधारला नाही तसा तमाशा पहावून बिघडलेला नाही

समाजहीत राष्ट्रहीत सुधारणा उपाययोजना जे मनापासून पहातात जे उपेक्षित दुर्लक्षित मागास बहुजन घटकांचे हितासाठी तन मन धन वेचून स्वतःला समाजकार्याला झोकून सदैव समाजहित पहातात त्यांना लोक डोक्यावर घेतात अंतःकरणात साठवतात प्रबोधनकार ठाकरे यांचे ते नातू आहेत पण त्यांच्या विचाराच्या बरोबर उलटे ते काम करतात खरे तर प्रबोधनकार यांचा नातू वारस या नात्याला राज ठाकरे कमीपणा आणून त्यांचे लौकिक कार्याला तिलांजली देण्याचे पातक करत आहेत त्यांच्या सभेचा पसारा खर्च पहिला तर कोटीच्या कोटी असतो या पक्ष्यकडे एवढा खर्च करण्याची क्षमता आर्थिक बाजू ते कशी सांभाळतात त्यांना एवढ्या मोठ्या आर्थिक देणगी कुठून मिळवतात हे नव्याने सांगण्याची गरज वाटतं नाही एवढे करुन गल्ली ते दिल्ली त्यांची राजकीय सामाजिक ताकद काय महिन्यातून चार महिन्यात तुन राज गर्जना या नावाखाली ठराविक शहरात त्याच त्याच विषयावर सभा घेऊन माध्यमाना शिळ्या कढीला ऊत आणणारे विषय कारण देऊन चर्चेत रहाणं या पलीकडे राज ठाकरे महाराष्ट्रासाठी काय करू शकले किंवा करू शकतात हा महाराष्ट्रातील जनतेला पडलेला प्रश्न आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button