महाराष्ट्र

मोहिते पाटलांच्या कर्तुत्वाचा आलेख अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे–रोहित पवार यांना अनावृत पत्र…

उपसंपादक——- हुसेन मुलानी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो . 97 30 867 448

अकलुज ची धमक आणि चमक अजून ही तीचआहे..तोच दरारा..तोच रुबाब..ऊगीच काय काका माढा सोडून पळाले..विचारा आजोबांना काय मोहितेपाटीलांचा दरारा राजकारणात दबदबा होता..राष्टवादी स्थापन करताना मोहितेपाटीलांचे होकारासाठी साहेब तीन दिवस थांबले होते..पुर्वाश्रमीचा वसंतदादा गट हा विजयदादांचे नेतृत्वाखाली कार्यरत होता..आपल्या कामाचे आवाक्याने विजयदादा हे शरद पवार यांचे नंतरचे एक प्रभावशाली राजकीय व्यक्तिमत्व होते..ज्या ज्या खात्याचा कारभार त्यांचेकडे होता त्या खात्याचे त्यांनी सोने करुन दाखवले..

राष्टवादीत ज्यावेळी राष्टवादीतील विधानसभाचा प्रमुख नेता कुणाला करायचे याचे आमदारामध्ये गुप्त मतदान घेण्यात आले त्यावेळी विजयदादांना बहुतांशी आमदारांनी पसंती दर्शविली होती..त्याही पुढे जावुन श्री रणजितदादा नी राष्टवादी युवक काँग्रेसची प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी लिलया पेलली व सबंध महाराष्ट चाद्यापासुन बांद्यापर्यत राष्टवादी प्रचारासाठी पालथा घातला..त्यावेळी अमरावतीच्या राज्यस्तरीय युवक मेळाव्यात शरद पवार साहेबांनी युवकांचे संघटन पाहुन रणजितदादांचे पाठीवर कोतुकाची थाप टाकली व मला उद्याच्या महाराष्टाची चिंता नाही असे गौरवौद्गार काढले..मोहिते पाटीलांचे कर्तुत्व चा आलेख अख्या महाराष्टाला माहीत आहे,,

तुम्हि राजकारणात यायच्या अगोदर तीन पिढ्या मोहितेपाटीलांनी लोकांच्या कल्याणासाठी समाजकारणासाठी खर्ची घातल्या आहेत हे थोडे सोलापुर जिल्हाचा ईतिहास तपासुन पहा..ऊगाच लहान तौंडी मोठा घास घेवु नका..कै.सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील यांनी अकलुज चे माळरानावर कारखाना काढला त्यावेळी आपलेच पुर्वज सहकारमहर्षिचे मांढीला मांडी लावुन काम केलेत..हे विसरु नका..राष्टवादीच्या स्थापनेवेळेस काँग्रेस कडुन विजयदादांना मुख्यमंत्रिपदाची आँफर होती तरि दादांनी शरद पवार साहेबांची साथ दिली याचा विसर पडु देवु नका..कुणाला तरी बरे वाटावे म्हणुन सोलापुर जिल्हात येवुन मोहिते पाटीलावर टिका करणे अकलुज ची चमक आणी धमक आत्ता पुर्वापेक्षा तेज आहे,

विजयदादांचा स्वभाव मितभाषी व मवाळ आहे..आत्ता पुढची पिढी तशी नाही जशास तसे ऊत्तर देण्याची चमक व धमक आत्ताचे नेतृत्वात आहे हे विसरु नका..त्यामुळे मोहितेपाटीलावर टिका करताना दहादा विचार करा..हाच तुम्हाला सल्ला..

  आपला

हितचिंतक ,.भारत जाधव ऊत्तर सोलापुर,,9822383444,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button