शहर

महाळुंग श्रीपुर नगरपंचायत मधील गैरव्यवहार व नित्कृष्ट कामाचे चौकशीसाठी अशोक युवराज भोसले यांचे आयुक्त कार्यालय पुणे येथे बेमुदत आमरण उपोषण.

उपसंपादक——– हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448

महाळुंग श्रीपुर नगरपंचायत हद्दीत सन 2022 2023 मध्ये विविध विकास कामामध्ये झालेल्या गैरव्यवहाराच्या व निकृष्ट दर्जाच्या कामाची तात्काळ विभागीय स्तरावरून निष्पक्षपणे चौकशी करावी व चौकशी पूर्ण होईपर्यंत महाळुंग श्रीपूरचे मुख्याधिकारी कौस्तुभ गव्हाणे यांना सक्तीच्या रजेवर पाठवून नगरपंचायत मध्ये प्रशासक नियुक्त करावा या मागणीसाठी अशोक युवराज भोसले (सामाजिक कार्यकर्ता) रा. महाळुंग ता. माळशिरस जि. सोलापूर हे आज 1 मे 2023 (महाराष्ट्र दिनी ) रोजी प्रादेशिक संचालक पुणे आयुक्त कार्यालय (नगर परिषद प्रशासन विभाग) यांच्या कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणास बसले असून त्यांनी पुढील तक्रारीची निवेदनात मागणी केली आहे

महाळुंग श्रीपुर नगरपंचायत स्थापन झाले पासून या नगरपंचायत मध्ये प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी संगणमत करून घनकचरा व्यवस्थापन ठेका, नगरोत्थान योजना, पाणीपुरवठा योजना, रस्ते काँक्रेट, गटारी (भूमिगत ड्रेनेज) शौचालय आदी व इतर कामांमध्ये बेकायदा हस्तक्षेप करून गैरव्यवहार केलेला आहे याबाबत स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी व विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी वारंवार व वेळोवेळी निवेदन देऊन चौकशीची मागणी केली मात्र त्यांच्या या मागणीला प्रशासनाने व लोकप्रतिनिधींनी केराची टोपली दाखवण्याचे काम केले आहे

या कार्यालयामध्ये ग्रामपंचायत काळापासून नोकर कामगार भरतीमध्ये खूप मोठा घोटाळा झाला असल्यामुळे नगरपरिषद प्रशासन विभाग आयुक्त कार्यालय पुणे यांनी समावेशनास स्थगिती दिली आहे या एक वा अनेक समस्या नगरपंचायत- महाळुंग श्रीपुर, मध्ये असून याची कायदेशीर पणे निष्पक्ष चौकशी होऊन दोषीवर कार्यवाही व्हावी या मागणीसाठी आपल्या कार्यालया कडून चौकशी मागणीचा अर्ज सादर केला असून येत्या 27 एप्रिल 2023 पर्यंत सदर प्रकरणी विभागीय स्तरावरील चौकशी समिती स्थापन करून मुख्य अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवून या नगरपंचायत वर प्रशासक नेमावा व दिनांक 30 एप्रिल 2023 पर्यंत सदरची चौकशी व कार्यवाही न केल्यास मी व माझ्या समविचारी मित्र समवेत आयुक्त कार्यालय पुणे समोर( महाराष्ट्र दिनी )1 मे 2023 रोजी पासून बेमुदत आमरण उपोषण करण्याकरिता आंदोलनास बसणार असून माझी मागणी पूर्ण होईपर्यंत मी प्राण गेला तरी जागा सोडणार नाही

असे दिलेल्या निवेदनात म्हटले असून दिनांक 30 एप्रिल 2023 पर्यंत अद्याप पुणे आयुक्त कार्यालयाने काहीही कारवाई न केल्याने महाळुंग श्रीपुर नगरपंचायत मधील गैरव्यवहाराच्या व निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करिता अशोक युवराज भोसले राहणार महाळुंग हे पुणे येथील आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसले आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button